भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्यासाठी श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सामना कायम लक्षात राहणार आहे. गुरूवारी (5 जानेवारी) झालेल्या या सामन्यात त्याने दोन षटकात 5 नो-बॉल टाकण्याची वाईट कामगिरी केली. यामधील नो-बॉलची हॅट्ट्रीक त्याने त्याच्या पहिल्याच षटकात पूर्ण केली. त्या षटकात त्याने चौकार आणि षटकार दिले. त्याची ही धक्कादायक गोलंदाजी पाहून कर्णधार हार्दिक पंड्या याच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
अर्शदीपने श्रीलंकेच्या डावातील दुसऱ्याच षटकात लागोपाठ तीन नो-बॉल टाकले. या षटकात त्याने 19 धावा खर्च केल्या. यामुळे हार्दिकने त्याला अधिक संधी दिल्या नाही. त्याने अर्शदीपला थेट 19वे षटक दिले. यामध्ये तरी तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा असताना पुन्हा त्याने नो-बॉल टाकला.
झाले असे की, अर्शदीपने 19व्या षटकातील चौथा चेंडू दसुन शनाका (Dasun Shanaka) याला टाकला. त्याने उत्तम शॉट लॉग ऑनवर मारला. तेथे उभा असलेल्या सूर्यकुमार यादवे तो चेंडू झेलला. त्याला वाटले शनाका बाद झाला. यामुळे त्याने सेलेब्रेशन करण्यास सुरूवात देखील केली, मात्र अर्शदीपने नो-बॉल टाकला असल्याचा निर्णय पंचांनी दिला आणि हार्दिकने निराश होत चेहरा लपवला. त्याच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
यानंतर हार्दिक अर्शदीपकडे गेला आणि त्यांनी चर्चा केली. या सामन्यात अर्शदीपने 2 षटकात 37 धावा दिल्या. तसेच पुढे शनाकाने 4 षटकार मारले.
https://twitter.com/cricketfanvideo/status/1611062010514636801?s=20&t=WhE9AgDP3QrDj57FP3vv7w
या सामन्यात भारताची गोलंदाजी इतकी सुमार होती की, पुण्यात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 200 धावसंख्येचा आकडा पार करण्याची ही केवळ दुसरीच वेळ ठरली. यामध्ये श्रीलंकेने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 206 धावा केल्या. त्यामध्ये शनाकाने 22 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पहिल्या 5 विकेट्स 57 धावसंख्येवरच गमावल्या. अशा स्थितीत सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी हार मानली नाही.
सूर्यकुमार 51 आणि अक्षर 65 धावा करत बाद झाले. भारताला हा सामना जिंकण्यासाठी 16 धावा अपुऱ्या पडल्या. यामुळे तीन सामन्यांची ही टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आली. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 7 जानेवारीला राजकोट येथे खेळला जाणार आहे.
(Hardik Pandya’s reaction to Arshdeep Singh’s no ball video Goes Viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: कपिल देव आणि 4 चेंडूत 4 षटकार…
मागील सात वर्षापासून भारत श्रीलंकेविरुद्ध विजय रथावर होता स्वार, पुण्यात घडला विचित्र योगायोग