टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत पोहोचला, मात्र इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्याची तयारी करताना दिसला. या दौऱ्यात प्रत्येकी तीन-तीन सामन्यांची टी20 आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे. याची सुरूवात टी20ने होणार असून पहिला सामना 18 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. यामुळे या दौऱ्यात असलेले काही खेळाडू न्यूझीलंडचा रवानादेखील झाले, मात्र यावेळी एका खेळाडूने केलेली पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेयर केली आहे. ज्यामध्ये भारताचे तीन स्टार खेळाडू दिसत आहेत. या फोटोमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा डोके टेकवून झोपताना दिसत आहे, तर त्याच्या पायापाशी रिषभ पंत आणि चहल झोपलेले दिसत आहेत. चहलची पत्नी धनश्री हीने सर्वप्रथम हा फोटो शेयर केला.
या दौऱ्यातून नियमित कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली, केएल राहुल आणि अनुभवी फिरकीपटू आर अश्विन यांना वगळले आहे. त्याचबरोबर कोचिंग स्टाफलाही टी20 विश्वचषकानंतर ब्रेक दिला आहे.
बीसीसीआयचे एका सूत्राने पीटीआयशी बोलताना म्हटले, “न्यूझीलंडच्या दौऱ्यात व्हीव्हीएस लक्ष्मण हे मुख्य प्रशिक्षक असतील तर त्यांच्या बरोबरीने ऋषिकेश कानिटकर हे फलंदाजी प्रशिक्षक आणि साईराज बहुतुले गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात सामील होणार आहेत.”
भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळण्याची लक्ष्मण यांची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी झिम्बाब्वे आणि आयर्लंड दौऱ्यातही ही जबाबदारी पार पाडली आहे. टी20 विश्वचषकाआधी घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतही ते संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. Hardik Pandya’s team leaves for New Zealand; Suryakumar Yadav, Chahal and Pant were seen sleeping on the airport floor
न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेत हार्दिक पंड्या आणि वनडे मालिकेत शिखर धवन भारताचे नेतृत्व करणार आहे. पंड्याने आयर्लंड दौऱ्यात संघाचे नेतृत्व केले होते आणि ती टी20 मालिका भारताने जिंकली होती. त्याचबरोबर भारताने धवनच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा वनडे मालिकेत पराभव केला आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
टी20- शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप ट्रॉफीसह इतक्या कोटींचा धनी होणार विश्वविजेता संघ; टीम इंडियाच्या पदरातही कोट्यावधी
आता आयसीसीतही वाढले जय शहांच वजन! महत्त्वाचं खातं पडलंय पदरात