---Advertisement---

हार्दिक पांड्याची पत्नी नताशाच्या जुन्या बॉयफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल

On: शुक्रवार, मे 28, 2021 12:26 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांने 2020 मध्ये अभिनेत्री नताशा स्टेनकोविक सोबत लग्न केले आहे. सध्या दोघे आई – वडील बनले असून दोघांना एक मुलगा आहे. हार्दिक व नताशा यांच्या मुलाचे नाव अगस्त्य असून दोघेही त्याचे फोटो सोशल मीडियात कायम शेयर करत असतात.

दरम्यान सध्या हार्दिक पांड्याची पत्नी नताशाच्या जुन्या बॉयफ्रेंडचा फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. नताशा हार्दिक सोबत लग्न करण्यापूर्वी एका टीव्ही अभिनेत्यासोबत नात्यात होती.नताशा ही अभिनेता व डांसर अली गोनी सोबत प्रेमाच्या नात्यात होती. नताशा आणि अली हे जवळजवळ एक वर्ष सोबत होते.

नताशा यादरम्यान गायक बादशहाच्या प्रसिद्ध “डीजे वाले बाबू” या गाण्यातही दिसली होती. तसेच नताशा ही बिग बॉसच्या आठव्या मोसमात देखील सहभागी झाली होती. विशेष म्हणजे काही कालावधीनंतर गोनीला हार्दिक व नताशा बद्दलच्या नात्याची माहिती समजली होती. गोनीने सांगितली की नताशानेच ही बाब त्याला सांगितली होती.

दरम्यान हार्दिक व नताशा सध्या आनंदाने एकत्र राहत असून,त्यांच्यामधील प्रेम हे ते शेयर करत असलेल्या फोटो व व्हिडिओंमधून स्पष्टपणे जाणवते. नताशा व हार्दिक आपल्या डान्सचे व्हिडिओ कायम सोशल मीडियात शेयर करत असतात.मागील काही दिवसांपूर्वीच नताशाने हार्दिक व त्यांच्या मुलाचा एक क्यूट फोटो सोशल मीडियात शेयर केला होता ज्याला लोकांनी मोठ्याप्रमाणात पसंद केले होते.

दरम्यान हर्दिकचा विचार केला असता, आयपीएल 2021 स्पर्धा रद्द झाल्यानंतर हार्दिक आता थेट श्रीलंका दौऱ्यातच मैदानावर खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत हार्दिकला भारतीय संघाचे कर्णधारपद मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की हार्दिकला कर्णधारपद मिळते अथवा नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंका दौऱ्यासाठी हर्षा भोगलेंनी निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, पाहा कोणाला दिली संधी

वाढदिवशी पण शास्त्री गुरूजी ट्विटरवर ट्रोल, पाहा काही भन्नाट मिम्स

५ कमनशिबी कर्णधार, ज्यांना केवळ एकाच टी२० सामन्यात मिळाली नेतृत्वाची संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---