---Advertisement---

हार्दिक पांड्याने इतिहास रचला! 100 विकेट्स घेत विश्वविक्रम करणारा ठरला ‘पहिला’ अष्टपैलू खेळाडू

On: रविवार, डिसेंबर 14, 2025 8:46 PM
---Advertisement---

हार्दिक पांड्याने (Hardik pandya) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विश्वविक्रम केला आहे. तो आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार धावा आणि 100 विकेट्स पूर्ण करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू (Fast Bowling All-rounder) बनला आहे. ट्रिस्टन स्टब्सची विकेट घेताच त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली. याचसोबत, त्याने टी-20 क्रिकेटमध्ये विकेट्सचा एक खास टप्पाही पार केला आहे.

धर्मशाळामध्ये (Dharamshala) सुरू असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या नावावर 99 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स होत्या. ट्रिस्टन स्टब्सला बाद करताच त्याने टी-20 फॉर्मेटमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण केले. तो अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे.

हार्दिक पांड्या हा जगातील असा पहिला वेगवान गोलंदाज अष्टपैलू आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 विकेट्स पूर्ण केले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा हार्दिक पांड्या तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने आपल्या टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत 1939 धावा करण्यासोबतच गोलंदाजीत 100 विकेट्स घेतल्या आहेत.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू:
अर्शदीप सिंग 108
जसप्रीत बुमराह 101
हार्दिक पांड्या 100

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---