---Advertisement---

एकावेळी टी२० संघाचे कर्णधारपद सांभाळलेले ५ क्रिकेटपटू, जे आज कोणाला आठवतही नाही

On: बुधवार, जुलै 15, 2020 10:51 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटला २००५ साली सुरुवात झाली. त्यानंतर या क्रिकेट प्रकाराने प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळी जागा निर्माण केली. आज प्रत्येकाला टी-२० क्रिकेट स्वरूप आवडते. खरं तर टी-२० क्रिकेटने हे आज खूप मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या स्वरूपात अनेक लीग स्पर्धा सर्व देशांमध्ये खेळल्या जातात. ज्यात अनेक खेळाडू सहभागी होतात. टी२० क्रिकेट इतिहासात या १५ वर्षात सर्व संघांसाठी अनेक कर्णधार होऊन गेलेत. ज्यामध्ये बरेच कर्णधार क्रिकेट चाहत्यांच्या आजही लक्षात आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये असे बरेच कर्णधार होऊन गेलेत, ज्यांनी प्रमुख कर्णधाराच्या अनुपस्थितीत आपल्या संघासाठी कर्णधार म्हणून काम केले आहे, परंतु ते क्वचितच लक्षात राहिले. अशाच ५ क्रिकेटपटूंचा घेतलेला हा आढावा –

१. जेम्स ट्रेडवेल (James Tredwell)

इंग्लंड क्रिकेट संघासाठी टी२० क्रिकेट इतिहासात अनेक कर्णधार होऊन गेले. ज्यामध्ये केविन पीटरसन, पॉल कॉलिंगवूड, ओएन मॉर्गन किंवा जोस बटलरसारखे कर्णधार आठवतात. परंतु इंग्लंड टी२० संघाचे नेतृत्व इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जेम्स ट्रेडवेल यानेही केले होते.

२०१३ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० सामन्यात जेम्स ट्रेडवेलने कर्णधारपद भूषवले होते, परंतु दुर्दैवाने त्या सामन्यात निकाल लागला नाही.

२. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)

भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळताना दिसत नाही. तो २०१८ ला शेवटचा वनडे तर २०१६ ला शेवटचा टी२० सामना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला आहे.

पण असे असले तरी त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये कर्णधारपद देखील सांभाळले आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध २ टी२० सामन्यांचे नेतृत्व केले आहे, त्यातील १ सामना जिंकला आहे आणि एका सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला आहे.

३. काइली मिल्स (Kyle Mills)

न्यूझीलंड क्रिकेट संघ हा विश्व क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. टी२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. या संघाकडे अनेक अनुभवी कर्णधार होऊन गेले जे सर्वांना माहिती आहेत.

परंतु न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज काइली मिल्सलाही टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधारपद सांभाळण्याची संधी मिळाली होती. मिल्सला २०१३ मध्ये दोन टी२० सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले होते, त्यातील त्याने एक सामना जिंकला आणि एक सामना गमावला.

४. ब्रेड हॅडिन (Brad Haddin)

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिन बराच काळ या संघाकडून खेळत राहिला. ब्रॅड हॅडिन ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून खेळताना तिन्ही क्रिकेट प्रकारात यश मिळवले.
ब्रॅड हॅडिनला एकदा ऑस्ट्रेलियासाठी टी२०मध्ये कर्णधारपद सांभाळण्याचा मान देखील मिळाला.

रिकी पॉन्टिंग आणि मायकेल क्लार्क यांच्या अनुपस्थितीत हॅडिनला कर्णधारपद मिळालं, त्याने २ टी२० सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळलं. तो एक सामन्या विजयी झाला तर एका सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला.

५. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)

भारतीय क्रिकेट संघाने २००६ मध्ये टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताच्या टी२० क्रिकेटमध्ये एमएस धोनी, विराट कोहलीसारखे मोठे आणि यशस्वी कर्णधार आहेत पण माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला भारताच्या पहिल्याच टी२० सामन्यात संघाच्या नेतृत्त्वाची संधी मिळाली होती.

सेहवागने कर्णधारपद भूषवले आणि भारतासाठी इतिहासातील पहिला टी२० सामना कर्णधार म्हणून जिंकूनही दिला. परंतु वीरेंद्र सेहवागनेही टी२०मध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे हे बऱ्याच लोकांना माहित नसेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---