मुंबई । पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस राऊफचा कोरोना अहवाल सतत पॉझिटिव्ह आढळून येत आहे. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्ध मायदेशात झालेल्या टी२० मालिकेत खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
मागील आठवड्यात देखील त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लाहोर येथे सितारा हॉस्पिटलमध्ये खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या जैविक वातावरणामधून त्याला घरी परत जाण्यास सांगितले आहे.
पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता मिसबाह-उल-हक यांनी म्हटले की, ” इंग्लंड दौऱ्यातील कसोटी आणि टी20 मालिकेसाठी पाकिस्तान संघात सामील होण्यासाठी राऊफकडे असलेली वेळ आता संपत आहे.”
त्याचा कोरोना अहवाल सतत पॉझिटिव्ह येत असल्यामुळे मागील दोन आठवड्यांपासून राऊफ हॉटेलमध्ये आहे. आता तो इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची शक्यता देखील कमी आहे. कारण पीसीबीने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती दिली आहे.
आमीर आणि इम्रान यांचा कोरोना अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आला तर ते दोघेही इंग्लंडला रवाना होतील. आमिरची पत्नी दुसऱ्या मुलाला जन्म देणार असल्याने त्याने सुरुवातीला या दौऱ्यास जाण्यास नकार दिला होता.
मिस्बाह यांनी सांगितले की, आमिरला संघात घेण्यापूर्वी कर्णधार आणि सहकारी निवडकर्त्यांचा सल्ला घेतला. राऊफला अधिक अनुभव यावा यासाठी संधी दिली होती. परंतु दुर्दैवाने त्याचा कोरोना अहवाल सतत पॉझिटिव्ह येत असल्याने मिस्बाह यांच्या योजनेवर पाणी फेरले.
ट्रेंडिंग घडामोडी –
इंग्लंडची कसोटी चॅम्पियनशिपच्या पाँइंट टेबलमध्ये मोठी झेप; जाणून घ्या किती आहेत गुण
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जडेजा- पंड्याचे खेळणे कठीण, पहा कोण म्हणतंय
गोलंदाजी करत असताना अचानक बेन स्टोक्स सीमारेषेकडे धावला आणि…