---Advertisement---

१६ वर्षीय शेफाली वर्माला टीम इंडियाकडून मिळतोय या गोष्टीसाठी मोठा पाठिंबा

On: रविवार, मार्च 1, 2020 3:00 PM
---Advertisement---

काल (29 फेब्रुवारी) मेलबर्न येथे भारतीय महिला संघ विरुद्ध श्रीलंका महिला संघात (Indian Women’s Team Vs Shri Lanka Women’s Team) आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) सामना पार पडला. हा सामना भारतीय संघाने 7 विकेट्सने जिंकला.

भारताचा हा या विश्वचषकातील सलग चौथा विजय आहे. यावेळी सलामीवीर फलंदाज शेफालीने 34 चेंडूत सर्वाधिक 47 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

यावेळी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) शेफालीचे कौतुक करताना सांगितले की, “संघ व्यवस्थापनाने शेफाली वर्माला (Shafali Verma) तिचा नैसर्गिक खेळ खेळण्याची परवानगी दिली आहे.”

16 वर्षीय शेफालीने महिला टी20 विश्वचषकात दमदार फलंदाजी प्रदर्शन केले आहे. तिने 4 टी20सामन्यात 161 धावा केल्या आहेत. यात 18 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश आहे आणि तिचा स्ट्राईक रेट 161 इतका आहे. यासह ती सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली, “शेफालीला मोठे शॉट खेळायला आवडतात आणि आम्हाला तिला थांबवायचे नाही. तिने पुढेही असेच खेळावे अशी आमची इच्छा आहे.”

भारत साखळी फेरीतील आपले सर्व सामने जिंकत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यावर हरमनप्रीत म्हणाली, “विजय अभियान कायम ठेवणे महत्वाचे आहे. जेव्हा सलग विजय मिळत असतो तेव्हा त्याचे सातत्य टिकवून ठेवावे लागते. मुळात आम्ही यासाठी खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे अचानक पराभवाला सामोरे जाणे कठीण आहे.”

श्रीलंका विरुद्धच्या सामन्यादरम्यान शेफालीला 2 वेळा जीवनदान मिळाले. त्यामुळे श्रीलंका महिला संघाची कर्णधार चमारी अटापट्टू नाराज झाल्याचे दिसून आले. ती म्हणाली, “आमच्या धावा पुरेशा नव्हत्या. याबरोबरच शेफालीला 2 जीवनदान देत आम्ही विजयाच्या संधीही गमावल्या. तिला खेळताना अडवणे खूप अवघड होते.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---