भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यावर आयसीसीकडून अखेर कारवाई झाली. भारतीय कर्णधार शनिवारी (23 जुलै) बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात गैरवर्तन करताना दिसली होती. परिणामी आयसीसीने मर्यादित षटकांतील पुढच्या दोन सामन्यांसाठी तिच्यावर बंदी घातली आहे.
हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिला आयसीसीकडून लेवल दोनच्या गुन्ह्यासाठी पात्र ठरवले गेले आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे भारतीय कर्णधार बाद झाल्यानंतर स्टंप्सवर बॅट मारताना दिसली होती. सोबतच तिने पंचांशीही चुकीच्या पद्धतीने संभाषण केले होते. याच पार्श्वभूमीवर आयसीसीकडून हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले. सामना संपल्यानंतर हरमनप्रीत पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये पंचांच्या निर्णायाबाबत नाराजी व्यक्त करताना दिसली होती.
कर्णधार एवढे करून थांबली नाही. हरमनप्रीतने मालिका आणि सामना बरोबरीत सुटल्यानंतर ट्रॉफीसोबत फोटो काढताना बांगलादेश संघ आणि त्यांच्या कर्णधाराला डिवचण्याचा प्रयत्न केला. हरमनप्रीतचे हे वागणे बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना () हिला पटले नाही आणि तिने ड्रेसिंग रुममध्ये परतण्याचा निर्णय घेतला. हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
माहितीनुसार हरमनप्रीतने बॅट स्टंप्सवर मारल्यामुळे तिला तीन डिमेरीट पॉइंट्स दिले गेले आहेत. तसेच पंचांशी गैरवर्तन केल्यामुळे एक डिमेरीट पॉइंट दिला गेला आहे. आयसीसीच्या नियमानुसार कोणत्याही खेळाडूला 24 महिन्यांच्या आत चार डिमेरिट पॉइंट्स मिळाले, त्याच्यावर एक कसोटी किंवा दोन मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी बंदी घातली जाते. माहितीनुसार भारतीय संघ आगामी काळात कोणा एका देशासोबत वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे, ज्याचे वेळापत्रक अद्याप समोर आले नाहीये. अशात हरमनप्रीतला या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागेल. (Harmanpreet Kaur has been suspended for 2 matches.)
बातमी अपडेच होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा फेरबदल! मिसबाह उल हकची पीसीबीमध्ये पुन्हा एन्ट्री
लवकरच जन्माला येणार बेबी मॅक्सवेल! भारतीय संस्कृतीनुसार पार पडले विनी रमनचे डोहाळे जेवण