---Advertisement---

हरमनप्रीत कौर खोटारडी, अपरिपक्व कर्णधार, मिताली राजच्या मॅनेजरची जोरदार टीका

On: शनिवार, नोव्हेंबर 24, 2018 7:00 AM
---Advertisement---

शुक्रवारी(२३ नोव्हेंबर) महिला विश्वचषकाची उपांत्य फेरी पार पडली. भारतीय महिला संघाला या उपांत्य सामन्यात इंग्लंड महिला संघाने ८ विकेट्सनी पराभूत करुन विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

त्यातच या सामन्यात भारताच्या ११ जणींच्या संघात भारताची अनुभवी फलंदाज मिताली राजला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे भारतीय टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर टीकेची झोड उठली आहे.

पण मिताली राजला संघाच्या बाहेर ठेवण्याबद्दल नाणेफेकीवेळी हरमनप्रीत कौरने स्पष्टीकरण देताना सांगितले की तिला आॅस्ट्रेलिया विरुद्धचा विजयी ११ जणींचा संघच कायम ठेवायचा होता. त्यामुळे मितालीला ११ जणांमध्ये संधी देण्यात आली नाही.

शनिवारी(१७ नोव्हेंबरला) भारतीय महिला संघाचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध साखळी फेरीचा सामना पार पडला होता. या सामन्यातही मिताली राजला संधी देण्यात आली नव्हती. हा सामना भारताने ४८ धावांनी जिंकला.

त्यामुळे उपांत्य सामन्यात मिताली पुन्हा पुनरागमन करेल असे सर्वांना वाटले होते. परंतू असे झाले नाही.

त्यामुळे मितालीला संघात स्थान न देण्याच्या निर्णयावर नाराज झालेल्या मितालीच्या मॅनेजर अनिशा गुप्ता यांनी ट्विटरवर हरमनप्रीत कौरवर जोरदार टीका केली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘भारतीय महिला खेळाडू दुर्दैवाने खेळावर ठेवण्यापेक्षा राजकारणावर विश्वास ठेवतात. आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात मितालीच्या अनुभवाचा फायदा कसा होतो हे पाहिल्यानंतरही त्यांनी अयोग्य, अपरिपक्व आणि खोटारडी कर्णधार हरमनप्रीत कौरची साथ देणे आश्चर्यकारक होते.’

या ट्विटनंतर मात्र अनिशा गुप्ता यांचे ट्विटर अकाउंट डीलिट झाले. परंतू त्यांनी इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना ते ट्विट त्यांनी केले असल्याची पुष्टी दिली आहे.

त्यांनी सांगितले की, ‘मला माहित नाही की आत काय चालले आहे. पण आता सर्व सामन्यांचे प्रसारण होत आहे. आपण कोण चांगली कामगिरी करत आहे आणि कोण नाही हे पाहू शकतो.’

‘आपण पाहू शकतो की मितालीने केलेल्या अफलातून कामगिरीनंतरही आणि तिने तिच्यातील क्षमता आणि सातत्य दाखवल्यानंतरही कशाप्रकारे तिला वागणूक मिळत आहे. यामध्ये गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.’

अनिशा पुढे म्हणाल्या, ‘तरुण खेळाडूंना संधी देण्याचा संघ विचार करत असल्याचे वृत्त आले होते, पण तूम्ही अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूला इंग्लंड सारख्या संघाविरुद्ध उपांत्य सामन्यात संघातून वगळू शकत नाही. तरुण खेळाडूंना संधी देण्यापेक्षा हे महत्त्वाचे आहे.’

ट्विटरवर जे काही ट्विट केले आहे त्याबद्दल खेद वाटतो का, या प्रश्नावर अनिशा म्हणाल्या, ‘कदाचीत मी चिडली आहे. पण मला वाटते की ते योग्य आहे, कारण मी चूकीच्या गोष्टींच्या बाजूने उभी राहू शकत नाही. ज्या प्रकारचे ‘फेवरेटीझम’ दाखवले जात आहे त्यावरुन सर्व उघड आहे. मला वाटते संघातील काही सदस्यांबाबतीत ‘फेवरिटीझम’ दाखवले जात असल्याचे सर्वजण पाहत आहेत.’

मितालीने या स्पर्धेत २ सामन्यात ५३.५० सरासरीने १०७ धावा केल्या आहेत. तीला या स्पर्धेच पाकिस्तान आणि आयर्लंड विरुद्ध फलंदाजीची संधी मिळाली होती. या दोन्ही सामन्यात तिने अर्धशतक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा- 

४७ वर्षीय भारतीय खेळाडूने हॅट्रिक घेत केला विश्वविक्रम

जाणून घ्या २०१९च्या आयपीएलसाठी कोणते संघ किती परदेशी खेळाडू खरेदी करु शकतात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment