---Advertisement---

कर्णधार हरमनप्रीत कौरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

On: शुक्रवार, मार्च 2, 2018 6:23 PM
---Advertisement---

भारतीय महिला टी २० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काल तिच्या खांद्यावर पंजाब पोलिसांमध्ये पोलीस उपअधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तिच्या युनिफॉर्मवर काल पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पोलीस महासंचालक सुरेश अरोरा यांनी विशेष स्टार लावले. याचा फोटो अमरिंदर सिंग यांनी ट्विटरवर शेयर केला आहे.

तसेच त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ” पंजाब पोलिसांमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाल्याबद्दल पोलीस महासंचालक सुरेश अरोरा हरमनप्रीत कौर या तरुण क्रिकेटपटूंच्या युनिफॉर्मवर स्टार लावत आहेत. तिचा अभिमान वाटतो. या मुलीने अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे आणि मला विश्वास आहे ती यापुढेही अशीच कामगिरी करेल. तिला माझ्या शुभेच्छा.”

https://twitter.com/capt_amarinder/status/969079833396379649

याआधी हरमनप्रीत भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व करत होती. पण तिने पंजाब पोलिसांमध्ये रुजू होण्यासाठी विनंती केल्यानंतर तिला भारतीय रेल्वेच्या सेवेतून मुक्त करण्यात आले. तसेच तिला रेल्वेबरोबर असणाऱ्या करारामुळे पंजाब पोलिसांमध्ये रुजू होण्यासाठी कोणतीही समस्या येऊ नये यासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून प्रयन्त केले.

हरमनप्रीतनेही याबद्दल ट्विट करताना आनंद आणि उत्सुकता वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे त्यांनी दिलेला पाठिंबा आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद म्हटले आहे. याबरोबरच हरमनप्रीतने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचेही आभार मानले आहेत.

https://twitter.com/ImHarmanpreet/status/966608693524647937

तिने भारतीय रेल्वेबरोबर केलेल्या करारानुसार तिला भारतीय रेल्वेत पाच वर्ष काम केल्याशिवाय मुक्त करण्यात येणार नव्हते किंवा तिला पाच वर्षाचे वेतन परत करावे लागणार होते.

हरमनप्रीतने याआधीच वेस्टर्न रेल्वेमध्ये ३ वर्ष कार्यालयीन अधीक्षकपद सांभाळले आहे. त्यानंतर तिने या पदाचा राजीनामा दिला होता.

तिने मागील वर्षी पार पडलेल्या महिला विश्वचषकात केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे तिला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पोलीस उपअधीक्षक पदाची ऑफर दिली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment