जून महिन्यात मलेशियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या महिलांच्या आशिया कप टी२० स्पर्धेसाठी आज भारताच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे.
या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हरमनप्रीत कौरकडे कायम असेल, तर उपकर्णधारपद सांगलीच्या स्म्रीती मानधनाकडे देण्यात आली आहे. या संघात कोणत्याही नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आलेली नाही.
ही स्पर्धा 1जून ते 11 जून दरम्यान होणार आहे. तसेच या आशिया कपमध्ये साखळी फेरीत प्रत्येक संघ एकमेकांविरूद्ध सामना खेळणार आहे. त्यातील पहिले दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील.
या स्पर्धेत भारत, पाकीस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, थायलंड आणि मलेशिया हे देश सहभागी होणार आहे.
या आशिया कप टी२० स्पर्धेसाठीची पात्रता फेरी 2017 मध्ये 20ते 27 नोव्हेंबरला झाली होती.
असा असेल आशिया कप टी२०साठी भारतीय महिला संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मानधना (उपकर्णधार), मिथाली राज, जेमिमा रॉड्रिग्स, दिप्ती शर्मा, अनुजा पाटील, वेदा कृष्णमूर्ती, तनिया भाटिया (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी,पुजा वस्त्रकार, शिखा पांडे, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, एकता बिष्त, मोना मेश्राम
महत्त्वाच्या बातम्या –
–मोहम्मद शमीची जन्मतारीख नक्की काय? १९८२ की १९९०?
–दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळला नेहरा, आता होणार या राज्यात स्थायिक
–मुंबईकर पृथ्वी शाॅ ठरला ११ मोसमातील अनेक खेळाडूंना सरस
–IPL 2018: आव्हान राखण्यासाठी मुंबईला आजचा विजय महत्त्वाचा
–Video: पहा सचिन तेंडूलकर, एमएस धोनीपोठीपाठ मुंबईकर पृथ्वी शॉचा हेलिकॉप्टर शॉट!