भारताची टी20 कर्णधार हरमनप्रीत कौर इंग्लंडमधील किया सुपर लीगमध्ये 2018च्या मोसमासाठी लँकेशायर थंडर संघाकडून खेळणार आहे.
ती मागच्या वर्षी या लीगमध्ये करारबद्ध होणारी पहिला भारतीय खेळाडू ठरली होती. तिला मागच्यावर्षी सरे स्टार्स संघाने करारबद्ध केले होते.
मात्र तिला मागच्या वर्षी पार पडलेल्या विश्वचषकावेळी दुखापत झाल्याने या लीगमधील पहिला मोसम खेळता आला नव्हता.
पण यावर्षीचा मोसम ती लँकेशायर थंडर संघाकडून खेळणार आहे. याची अधिकृत घोषणा अजून झाली नाही. पण ईएसपीएन क्रिकईन्फोने दिलेल्या वृत्ताप्रमाणे ती 15 जुलैला लँकेशायरकडून खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे.
या लीगमध्ये खेळणारी ती स्म्रीती मानधनानंतरची दुसरीच भारतीय खेळाडू ठरणार आहे. या लीगच्या गतविजेत्या वेस्टर्न स्ट्रोम संघाने मानधनाला करारबद्ध केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–…तर भारत-पाकिस्तान जागतिक क्रिकेटवर राज्य करु शकतात!
–कशी पहाल विंबल्डन याची देही याची डोळा?
–रहाणेला वनडेत का संधी दिली नाही? मुंबईकर दिग्गजाचे निवड समितीवर ताशेरे