भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात भारतासाठी कर्णधार हमनप्रीत कौर हिने अर्धशतक केले. याचाच फायदा हरमनप्रीतला ताज्या आयसीसी क्रमवारीत झाल्याचे दिसते. आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत हरमनप्रीतचे पहिल्या 10 क्रमांकांमध्ये पुनरागमन झाले आहे.
ताज्या आयसीसी क्रमवारीनुसार टी-20 फॉरमॅटमध्ये (महिला) पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची तहलिया मॅकग्रा आहे. मॅकग्राकडे फलंदाजांच्या यादीत 784 गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मॅकग्राची सहकारी बेथ मुनी आहे, जिच्याकडे 777 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 728 गुणांसह भारतीय दिग्गज स्मृती मंधाना आहे. चौथ्या क्रमांकावरील सोफी डिवाइन आहे. सोफीकडे 683 गुण आहेत. टी-20 फलंदाजांच्या यादीत पाचवा क्रमांक सुजी बेट्स हिचा आहे. सुजीकडे 677 गुण आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 35 चेंडूत 54 धावांची खेळी केली होती. रविवारी (9 जुलै) झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला आणि हरमनप्रीतला सामनावीर पुरस्कार दिला गेला. या सामन्यातील प्रदर्शनाचा फायदा हरमनप्रीतला आयसीसी टी-20 क्रमवारीत झाला. हरमनप्रीत पुन्हा एकदा टी-20 फलंदाजांच्या यादीत सर्वोत्तम 10मध्ये परतली आहे. सध्या ती इंग्लंडची नेट सायव्हर ब्रांट आणि श्रीलंकेची चमारी अथापत्थू यांच्यासह संयुक्तरित्या 10व्या क्रमांकावर आहे.
त्याव्यतिरिक्त बांगलादेशविरुद्धच्या या पहिल्या सामन्यात फिरकीपटू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने भारतासाठी किफायतशीर गोलंदाजी केली होती. याच पार्श्वभूमीवर गोलंदाजांच्या टी-20 क्रमवारीत दीप्ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिच्याकडे 733 गुण आहेत. विशेष म्हणजे दीप्तीला या सामन्यात एकही विकेट मिळाली नव्हती. पण आपल्या कोट्यात तिने अवघ्या 14 धावा खर्च केल्या होत्या. टी-20 गोलंदाजांमध्ये सोफी एक्लेस्टन 788 गुणांसह पहिल्या, तर नोनकुलुलेको 746 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Harmanpreet Kaur returns to the top 10 in the women’s T20 rankings)
महत्वाच्या बातम्या –
चार वर्षानंतर सापडला देवधर ट्रॉफीला मुहूर्त! पश्चिम विभागाच्या संघात महाराष्ट्राचे तीन जण, पाहा संघ
VIDEO: उपकर्णधार अजिंक्यची रोहितने घेतली फिरकी, पत्रकार बनत अक्षरशः भंडावून सोडले