सध्या ऑस्ट्रेलियामध्ये महिला बिग बॅश लीग खेळली जात आहे. मेलबर्न रेनेगेड्स संघाची मुख्य फलंदाज आणि भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर बिग बॅश लीगमधून बाहेर पडली आहे. दुखापत झाल्यामुळे तिने या महत्वाच्या लीगमधून माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. हरमनप्रीत्या पाठिला दुखापत झाल्याचे समोर येत आहे. मेलबर्न रेनेगेड्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही माहिती दिली गेली आहे.
काही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की, हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) महिला बिग बॅश लीगच्या या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. पण आता तिने या संपूर्ण हंगामातून माघार घेतल्याचे सांगितले गेले आहे. दरम्यान, मागच्या वर्षी बिग बॅश लीगमध्ये हरमनप्रीतने जबरदस्त पदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधले होते.
मेलबर्न रेनेगेड्सच्या जनरल मॅनेजर सांगितले आहे की, “हरमनप्रीत कौरने मागच्या हंगामात आमच्यासाठी अप्रतिम प्रदर्शन केले होते आणि यावर्षी आम्ही पुन्हा तिला आमच्या संघाचे प्रतिनिधित्व करताना पाहू इच्छित होतो. पण दुर्दैवाने ती दुखापतीच्या कारणास्तव स्पर्धेतून बाहेर झाली आहे.” हरमनप्रीतच्या जाही मागच्या आठवड्या मेलबर्न संघात एव जोन्स हिला सहभागी केले गेले होते. “एव जोन्स कमीत कमी पुढच्या काही सामन्यांपर्यंत आमच्या संघासोबत असेल. स्पर्धेतील बाकीच्या सामन्यांमध्ये आम्ही आमची सर्वात्तम रणनीती तयार करणार आहोत.”
https://twitter.com/RenegadesWBBL/status/1582608915975802880?s=20&t=JfVt8JEEzB7eDyiOWkEmpA
हरमनप्रीने मागच्या हंगामात केलेल्या प्रदर्शनाचा विचार केला, तर तिने नेत्रदीपक कामगिरी केली होती. या हंगामात केलेल्या प्रदर्शनासाठी तिला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. तिने 13 सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेण्यासोबतच 130.96 च्या स्ट्राईक रेटने 406 धावाही केल्या होत्या. मेलबर्न रेनेगेड्स संघ चॅलेंजर्स सामन्यात एडिलेडविरुद्ध पराभूत झाला होता आणि अंतिम सामन्याच्या शर्यतीतून देखील बाहेर पडला होता. यावर्षी देखी संघाची सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या सामन्यात संघाने विजय मिलवला आहे, पण दुसऱ्या सामन्यात त्यांना 21 धावांनी पराभव मिळाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
क्या मस्त मारा रे! रोवमन पॉवेलने भिरकावला 104 मीटरचा गगनचुंबी षटकार, सहकाऱ्याने डोक्यालाच लावला हात
व्हिडिओ: आफ्रिदीच्या घातक वेगवान यॉर्करने फलंदाज जखमी, सहकाऱ्याच्या पाठीवर बसून गेला मैदानाबाहेर