---Advertisement---

क्या मस्त मारा रे! रोवमन पॉवेलने भिरकावला 104 मीटरचा गगनचुंबी षटकार, सहकाऱ्याने डोक्यालाच लावला हात

On: बुधवार, ऑक्टोबर 19, 2022 6:03 PM
Rovman-Powell
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022मधील ब गटातील पहिल्या राऊंडचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडला. हा सामना वेस्ट इंडिज संघाने 31 धावांनी खिशात घातला. मागील सामन्यात पराभवाचा धक्का मिळालेल्या वेस्ट इंडिज संघाने या सामन्यात जोरदार पुनरागमन केले आहे. या सामन्यात वेस्ट इंडिंजच्या एका फलंदाजाने मारलेल्या षटकाराची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, त्याचा हा षटकाराचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना त्यांनी 7 विकेट्स गमावत 153 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वे संघाचा डाव 18.2 षटकातच 122 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने हा सामना सहजरीत्या 31 धावांंनी आपल्या नावावर केला.

वेस्ट इंडिजकडून फलंदाजी करताना जॉनसन चार्ल्स याने 45, रोवमन पॉवेल याने 28 आणि अकील हुसैन याने नाबाद 23 धावा चोपल्या. संघाने शेवटच्या षटकात 16 धावा लुटल्या. यामध्ये पॉवेलच्या 2 षटकारांचाही समावेश होता. पॉवेलच्या दोन षटकारांमधील एक षटकार खूपच जबरदस्त होता. त्याचा हा षटकार 104 मीटर लांबीचा होता. त्याने हा षटकार ब्लेसिंग मुजरबानीच्या डावाच्या शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मारला. पॉवेलने यापूर्वी पहिल्या चेंडूवरही षटकार मारला होता. मात्र, दुसरा षटकार खूपच लांब गेला.

पॉवेलचा हा षटकार पाहून दुसऱ्या बाजूला उभा असलेला फलंदाज अकील हुसैनही हैराण झाला. तो शेवटपर्यंत चेंडू पाहत राहिला. चेंडू छतावर गेल्यानंतर हुसैनची रिऍक्शन पाहण्यासारखी होती. कारण, पॉवेलचा शॉट पाहून त्याने डोके पकडले होते. गोलंदाजानेही दाताखाली चावली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/Cj5AwWCN4aF/?utm_source=ig_embed&ig_rid=2ef5cd7d-e104-4995-8e3d-83587fcf720f

वेस्ट इंडिजचा डाव
वेस्ट इंडिजच्या डावाबद्दल बोलायचं झालं, तर संघ एकेवेळी 1 विकेट गमावत 77 धावांच्या मजबूत स्थितीत खेळत होता. मात्र, तिथून पुढे संघ पूर्णपणे ढासळू लागला. त्यांनी 101 धावा करेपर्यंत त्यांच्या 6 विकेट्स गमावल्या. संघाने त्यांची दुसरी विकेट 77 धावांवर, तिसरी विकेट 90 धावांवर, चौथी आणि पाचवी विकेट 97 धावांवर आणि सहावी विकेट 101 धावांवर गमावली. शेवटी पॉवेल आणि हुसैन यांनी चांगली फटकेबाजी करत संघाची धावसंख्या 153 इतकी केली.

यामध्ये सिकंदर रझा याने एकाच षटकात दोन विकेट्स घेऊन वेस्ट इंडिज संघाचं कंबरडं मोडलं. रझाने या सामन्यात चार षटके टाकताना 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मुजरबानीनेही दोन विकेट्स घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जमलंय बघा! विराट कोहलीने केली ‘पुष्पा’मधील सुपरहिट ऍक्शन, व्हिडिओ जोरदार व्हायरल
दुख, दर्द, पीडा! विश्वचषक खेळण्यासाठी सोडली मोठी ऑफर, पाकिस्तान संघातूनही सानियाचा पती बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---