---Advertisement---

‘पंतप्रधान मोदींना भेटलो तेव्हा…’, भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने सांगितला किस्सा

On: रविवार, ऑगस्ट 14, 2022 6:54 PM
Harmanpreet-Kaur-Narendra-Modi
---Advertisement---

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी खेळाडूंची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी प्रत्येक खेळाडू आणि संघासोबत विशेष वेळ व्यतित केला. शिवाय प्रत्येकासोबत वैयक्तिक गप्पा देखील मारल्याचेसांगितले जात आहे. याच भेटीदरम्यानचे अनुभव भारतासाठी रौप्यपदक मिळवणाऱ्या महिला क्रिकेट संघाची कर्मधार पहरमनप्रीत कौर हिने व्यक्त केला आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने पीएम मोदींना भेटल्यानंतर सांगितले की, “जेव्हा पीएम मोदी त्यांच्याशी बोलत होते, तेव्हा वाटत होते की संपूर्ण देश त्यांच्या टीमला पाठिंबा देत आहेत.” हरमनप्रीत कौर म्हणाली की, “देशाच्या पंतप्रधानांकडून प्रोत्साहन मिळणे ही मोठी गोष्ट आहे.” पंतप्रधान मोदींनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधून परतलेल्या भारतीय खेळाडूंचे आपल्या घरी पाहुणचार केला. यावेळी त्यांनी या खेळांमधील भारतीय संघाच्या कामगिरीचे आणि प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाचे रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.

या भेटीनंतर हरमनप्रीत म्हणाली की, “देशाच्या पंतप्रधानांकडून प्रोत्साहन मिळणे ही मोठी गोष्ट आहे. जेव्हा पंतप्रधान मोदी आमच्याशी बोलत होते, तेव्हा असे वाटत होते की संपूर्ण देश आम्हाला पाठिंबा देत आहे आणि आमच्या मेहनतीचे कौतुक करत आहे. आमच्या क्रिकेट संघासाठी ही मोठी उपलब्धी आहे.”

रौप्यपदक महिला क्रिकेट संघाने पटकावले
बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला. पहिल्याच राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत रौप्यपदक जिंकले. येथे भारतीय संघ सुवर्णपदक जिंकण्याच्या मार्गावर होता, मात्र अंतिम सामन्याच्या शेवटच्या दोन षटकांत सामना उलटला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय संघाला ऑलआऊट करत सुवर्णपदक जिंकले. येथे भारताला ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी २२ सुवर्णांसह एकूण ६१ पदके जिंकली आहेत. येथील पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

वेगाचा बादशहा नॉर्किएला मिळाला नवा संघ; युवा प्रिटोरियसचेही उजळले नशीब

रिषभ-उर्वशी वाद| पंतची आणखी एक नवी पोस्ट चर्चेत; आता म्हणतोय…

शाकिब अल हसन रचणार इतिहास! बनणार ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---