इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ६०वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स संघात शुक्रवारी (दि. १३ मे) पार पडला. पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोर संघाच्या एका फलंदाजाचा पंजाबच्या क्षेत्ररक्षकाने अखेरच्या षटकादरम्यान जबरदस्त झेल घेतला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
झाले असे की, या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत २०९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला शेवटच्या ४ षटकात ८० धावा करायच्या होत्या. यावेळी नवव्या क्रमांकावर वनिंदू हसरंगा (Wanindu Hasasranga) फलंदाजीला आला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
पंजाबकडून सतरावे षटक राहुल चाहर टाकत होता. राहुलने या षटकातील चौथा चेंडू टाकताच हसरंगाने जोरदार फटका मारला. हा फटका पाहून असे वाटले की, चेंडू सीमारेषेपार जातोय. मात्र, हा चेंडू सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या पंजाबचा खेळाडू हरप्रीत ब्रारने शानदार पद्धतीने झेलला. हरप्रीतचा यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Excellent catch from @thisisbrar near the ropes! ???? ????@rdchahar1 with his second wicket of the match. ???? ????
Follow the match ▶️ https://t.co/jJzEACTIT1#TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/G5ohhzahXT
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2022
वनिंदू हसरंगा बाद झाला, तेव्हा तो १ धावेवर खेळत होता. तसेच, बेंगलोर संघाची धावसंख्या ही ८ विकेट्स गमावत १३७ इतकी होती. हसरंगानंतर पुढे फलंदाजीला येणाऱ्या खेळाडूला संघासाठी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सामन्याचा आढावा
पंजाब संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ विकेट्स गमावत २०९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघाला ९ विकेट्स गमावत फक्त १५५ धावाच करता आल्या आणि ते ५४ धावांनी पराभूत झाले. त्यामुळे बेंगलोर संघाची विजयाची हॅट्रिक हुकली.
Brar sadda superstar, desi kalakaar! ????????#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #RCBvPBKS #ਸਾਡਾਪੰਜਾਬ pic.twitter.com/Z5LtvEDbjk
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 13, 2022
उभय संघाची हंगामातील कामगिरी
पंजाब संघाने बेंगलोरविरुद्ध विजय मिळवताच त्यांनी हंगामातील सहावा विजय नावावर केला. त्यांनी आतापर्यंत १२ सामने खेळलेत. यापैकी ६ सामन्यात त्यांनी पराभवाचा धक्का बसलाय, तर उर्वरित ६ सामन्यात त्यांनी विजय मिळवलाय. दुसरीकडे, बेंगलोर संघाने आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. त्यातील ७ सामने त्यांनी जिंकले आहेत, तर उर्वरित ६ सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘किंग’ कोहलीचा नावाला साजेसा विक्रम! पंजाबविरुद्ध १ धाव काढताच अद्वितीय विक्रमाला घातली गवसणी






