आज आयपीएलचा २६वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज या संघांमध्ये खेळवला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने प्रथम फलंदाजी करतांना १७९ धावा केल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करतांना बंगलोरने सावध सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पंजाबच्या हरप्रीत ब्रारने कमाल केली. त्याने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स या बंगलोरच्या तिन्ही महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. या विकेटसह त्याने एका खास रांगेत देखील स्थान मिळवले.
हरप्रीत ब्रारची निर्णायक कामगिरी
पंजाबचा गोलंदाज हरप्रीत ब्रारने या सामन्यात बंगलोरची मधली फळी कापून काढत संघासाठी निर्णायक भूमिका बजावली. त्याने ११व्या षटकात विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांना बाद केले. तर १३व्या षटकात त्याने एबी डिव्हिलियर्सला देखील बाद केले. यासह एकाच आयपीएल सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्स या दोनही फलंदाजांना बाद करणारा तो केवळ सातवा फिरकी गोलंदाज ठरला.
यापूर्वी सहा गोलंदाजांनी हा कारनामा केला आहे. यात श्रेयस गोपाळ, हरभजन सिंग, कृणाल पंड्या, नितीश राणा, राशिद खान आणि सुनील नरिन यांचा समावेश आहे. यातील श्रेयस गोपाळने ही कामगिरी तब्बल तीन वेळा केली आहे. तर उर्वरित गोलंदाजांनी ही कामगिरी एकदा केली आहे. आता याच रांगेत हरप्रीत ब्रारने देखील स्थान मिळवले आहे.
एकाच आयपीएल सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्सला बाद करणारे फिरकी गोलंदाज –
१) श्रेयस गोपाळ (तीन वेळा)
२) हरभजन सिंग
३) कृणाल पंड्या
४) नितीश राणा
५) राशिद खान
६) सुनील नरिन
७) हरप्रीत ब्रार*
Spinners to pick the wickets of both Kohli-ABD in an IPL match:-
Shreyas Gopal (thrice)
Harbhajan
Krunal Pandya
Nitish Rana
Rashid Khan
Sunil Narine
Harpreet Brar*#PBKSvRCB— ComeOn Sports 🇮🇳 (@ComeOn_Sports) April 30, 2021
पंजाब किंग्जने दिली आरसीबीला मात
दरम्यान, या सामन्यात सांघिक कामगिरीच्या जोरावर पंजाबने आरसीबीला मात दिली. प्रथम फलंदाजी करतांना पंजाबने २० षटकांत ५ बाद १७९ धावा केल्या होत्या. यात कर्णधार केएल राहुलच्या सर्वाधिक नाबाद ९१ धावा होत्या. मात्र पंजाबने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करतांना आरसीबीला २० षटकांत ८ बाद १४५ धावाच करता आल्या. आरसीबीकडून कर्णधार विराट कोहलीच्या ३५ धावा सर्वोत्तम ठरल्या. पंजाबकडून हरप्रीत ब्रारनेच सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. या ३४ धावांच्या विजयासह पंजाबने हंगामातील आपला तिसरा विजय नोंदवला.
महत्वाच्या बातम्या:
PBKS vs RCB: फलंदाजांनी ठोकले, गोलंदाजांनी रोखले; पंजाबचा बेंगलोरला ३४ धावांनी पराभवाचा जोरदार धक्का
कौतुकास्पद! सचिन तेंडुलकरच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील महिला क्रिकेटपटूने केले रक्तदान
..आणि चेन्नईचा सदस्य घेऊन गेला नागरिकाचा आॉक्सिजन कॉन्सन्ट्रेटर