fbpx
Monday, January 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चौथ्या सामन्यात विल पुकोवस्कीच्या जागी ‘या’ खेळाडूला दिली जावू शकते संधी, प्रशिक्षकांनी दिले संकेत  

January 13, 2021
in टॉप बातम्या, क्रिकेट, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
0
Photo Courtesy: Twitter/@ICC

Photo Courtesy: Twitter/@ICC


भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथील क्रिकेट मैदानावर बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सोमवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने उत्तम प्रदर्शन करून हा सामना अनिर्णीत राखला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा तोंडचा घास भारतीय संघाने हिरावून घेतला. परंतु या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे शुक्रवारी खेळला जाणार आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी विल पुकोवस्की या ऑस्ट्रेलियन खेळाडू बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा युवा फलंदाज विल पुकोवस्कीने सिडनीत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्याचबरोबर या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना त्याने डाइव्ह मारली होती. ज्यामुळे त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो चौथा कसोटी सामना खेळेल की नाही यावर प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, चौथ्या कसोटी सामन्यासाठी विल पुकोवस्की फिट नाही झाला, तर त्याच्या जागी मार्कस हॅरिसला खेळण्याची संधी मिळू शकते.

विल पुकोवस्कीला पदार्पणाच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आभासी पत्रकार परिषदेत बोलताना जस्टीन लँगर म्हणाले, “विलच्या खांद्यावर अगोदरच सूज होती. तो त्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्कॅनिंग करणार होता. बघू आता काय होतय. तो जर खेळू शकला नाही, तर त्याच्या जागी मार्कस हॅरिस डावाची सुरुवात करेल.”

ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी विल पुकोवस्कीच्या फिट होण्याची आशा व्यक्त करताना म्हणाले, “तो तरूण आहे आणि पहिलाच सामना खेळला आहे. मानसिकरित्या थकला असेल. आज आम्ही त्याच्या स्थितीवर लक्ष ठेवू. अपेक्षा आहे की तो फिट होईल आणि खेळेल.

विल पुकोवस्कीने पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना पहिल्या डावात 110 चेंडूचा सामना करताना 4 चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या होत्या. त्याला या डावात नवदीप सैनीने पायचीत बाद केले होते. त्यांनंतर दुसर्‍या डावात त्याने 16 चेंडूचा सामना करताना 2 चौकारांच्या साह्याने फक्त 10 धावा केल्या होत्या. या डावात त्याला मोहम्मद सिराजने झेलबाद केले होते. त्याचा झेल बदली यष्टीरक्षक रिद्धीमान साहाने घेतला होता.

महत्वाच्या बातम्या:

खेळाडूंच्या दुखापतींना आयपीएल जबाबदार, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचे परखड मत

आयसीसीच्या ट्विटर अकाऊंटवर रंगला भारत-पाकिस्तानचा सामना, पाहा कोणी मारली बाजी 

गाबाच्या मैदानावर यांचा दबदबा! ब्रिस्बेनवरील कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारे तीन भारतीय गोलंदाज


Previous Post

आयसीसीच्या ट्विटर अकाऊंटवर रंगला भारत-पाकिस्तानचा सामना, पाहा कोणी मारली बाजी 

Next Post

दुखापतग्रस्त हनुमा विहारीच्या जागी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी ‘हे’ तीन खेळाडू प्रमुख दावेदार

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

“ऑस्ट्रेलियाने डाव लवकर घोषित करायला हवा होता”, माजी ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी केली टीका

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ब्रिस्बेन टेस्ट : भारत विजयी झाल्यास कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लागणार सुरुंग! जाणून घ्या

January 18, 2021
Screengrab: Twitter/ cricketcomau
क्रिकेट

व्वा काय डोकं चालवलंय! चेंडू चमकवण्यासाठी मयंकने शार्दुलच्या हातावर घासला चेंडू, पाहा व्हिडिओ

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शब्बास रे पठ्ठ्या! सिराजने पदार्पणाची मालिका खेळतानाच मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीतील दमदार कामगिरीनंतर सिराजची प्रतिक्रिया, ‘या’ कारणासाठी मानेल रहाणेचे आभार

January 18, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला….

January 18, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI

दुखापतग्रस्त हनुमा विहारीच्या जागी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी 'हे' तीन खेळाडू प्रमुख दावेदार

Photo Courtesy: Twitter/ ICC

ब्रिस्बेन कसोटीसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ, पुकोस्कीच्या जागेवर 'या' खेळाडूला संधी

Photo Courtesy: Twitter

थोडेथोडके नाही तर तब्बल १७ षटकारांची आतषबाजी करत 'या' भारतीय खेळाडूने रचले वर्ल्ड रेकॉर्ड्स

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.