इंग्लंडचा युवा क्रिकेटपटू हॅरी ब्रुक हा मागील काही काळापासून शानदार फॉर्ममध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याने सातत्यपूर्ण खेळ करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. क्रिकेटचे भविष्य देखील म्हणत आहेत. मात्र, असे असताना त्याने एक मोठा निर्णय घेतला.
ब्रुक नुकत्याच झालेल्या विरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार फॉर्ममध्ये दिसलेला. यापूर्वी देखील त्याने अनेकदा आपल्या आक्रमक फलंदाजीने इंग्लंडच्या विजयात योगदान दिले आहे. त्यानंतर आता तो आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. मात्र तत्पूर्वी, आपली फलंदाजी सुधारण्यासाठी त्याने एक वेगळाच मार्ग अवलंबला. ब्रुक याने मोठे फटके मारण्याची क्षमता सुधारण्यासाठी थेट काही काळ बेसबॉल खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रुक याला अमेरिकेतील प्रतिष्ठान मेजर लीग बेसबॉल या स्पर्धेचा युरोपमधील ब्रँड अँबेसिडर बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर तो आता काही काळ फ्लोरिडा येथे बेसबॉल प्रशिक्षण घेईल. क्रिकेटमध्ये ताकदवान फटके मारण्यासाठी बेसबॉलचा फायदा होईल असे त्याने म्हटले. याच कारणाने त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या केवळ 24 वर्षांचा असलेला ब्रुक सातत्याने शानदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने आपल्या अवघ्या सहाव्या कसोटी सामन्यात 800 पेक्षा जास्त धावा उभारल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी यांच्यानंतर सर्वाधिक आहे. तसेच, टी20 क्रिकेटमध्येही तो 140 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा करतो. याच कारणाने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याच्यावर तब्बल 13.25 कोटी अशी मोठी बोली लावली. तो पहिल्यांदाच आयपीएल खेळताना दिसणार आहे.
(Harry Brook Decided Playing Baseball In MBL Franchisee For Power Hitting Practice)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेस्सीचा जीव धोक्यात! कुटुंबाच्या सुपरमार्केटवर हल्लेखोरांकडून गोळीबार, स्टार फुटबॉलपटूला धमकी
ब्रेकिंग! विश्वचषकात विक्रमी खेळी करणारा दिग्गज फुटबॉलपटू काळाच्या पडद्याआड, क्रीडाविश्वावर शोककळा