आयपीएल 2023 मध्ये शुक्रवारी (14 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघासाठी पहिलाच हंगाम खेळत असलेल्या इंग्लंडच्या हॅरी ब्रुक याने शतक पूर्ण केले. अवघ्या चौथ्या सामन्यात त्याने हा कारनामा करून दाखवला. तसेच हे या हंगामातील कोणत्याही फलंदाजाकडून ठोकले गेलेले पहिले शतक ठरले. त्याचवेळी आपण जाणून घेऊया आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या प्रत्येक हंगामात पहिले शतक कोणत्या फलंदाजाने ठोकले आहे.
हंगामातील पहिल्या तीन सामन्यात मिळून केवळ 30 धावा करण्यात त्याला यश आलेले. मात्र, या सामन्यात त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 55 चेंडूवर 100 धावांची खेळी केली. यामध्ये 12 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता.
आयपीएलच्या इतिहासातील पहिले शतक हे पहिल्याच सामन्यात आले होते. 2008 मध्ये ब्रेंडन मॅकलमने 158 धावांची नाबाद खेळी केलेली. दुसऱ्या हंगामात हा मान दिल्ली डेअरडेविल्ससाठी खेळणाऱ्या एबी डिव्हिलियर्स याने मिळवला होता. तर, 2010 मध्ये राजस्थानसाठी युसुफ पठाणने ही कामगिरी केलेली. त्यानंतर पुढील तीन वर्ष अनुक्रमे किंग्ज इलेव्हन पंजाबचा पॉल वॉल्थटी, राजस्थान रॉयल्सचे अजिंक्य रहाणे व शेन वॉटसन हे हंगामातील पहिले शतक ठोकण्यात यशस्वी ठरलेले.
मुंबई इंडियन्ससाठी खेळणाऱ्या लेंडल सिमन्सने 2014, 2015 मध्ये चेन्नईसाठी ब्रेंडन मॅकलम व 2016 मध्ये दिल्लीच्या क्विंटन डी कॉकने हंगामातील पहिले शतक झळकावले. 2017 मध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करत असताना संजू सॅमसनने, 2018 मध्ये पंजाबसाठी ख्रिस गेलने व 2019 मध्ये संजू सॅमसनने पुन्हा राजस्थानसाठी हंगामात पहिल्यांदा 100 चा आकडा पार केला. 2020 मध्ये पंजाबसाठी केएल राहुल, 2021 मध्ये राजस्थानसाठी पुन्हा संजू सॅमसन व 2022 मध्ये जोस बटलरने ही कामगिरी साध्य करून दाखवली.
(Harry Brook First Centurian Of IPL 2023 Here List Of Every Season First Century)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पैसा वसूल! सव्वा तेरा कोटींचा हॅरी ब्रुक बनला आयपीएल 2023 चा पहिला शतकवीर, सनरायझर्सचा 228 धावांचा डोंगर
“तू स्वतःसाठी खेळतोय, क्रिकेटच तुला धडा शिकवेल”, गिलच्या संथ खेळीनंतर संतापला वीरू