इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तो भविष्यातील विराट कोहली आहे. इंग्लंड संघ सध्या दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला डे नाईट कसोटी सामना 16 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी सुरू झाला. नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी केली. मध्यक्रमात फलंदाजीला आलेल्या हॅरी ब्रुकने 81 चेंडूत 89 धावा कुटल्या. मागच्या 6 कसोटी डावांमध्ये फक्त एकदा ब्रुक 50 पेक्षा कमी धावांवर बाद झाला आहे.
गुरुवारी पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने त्यांचा पहिला डाव घोषित केला. हॅरी ब्रुक (Harry Brook) याच्या 89 धावांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 9 बाद 325 धावा केल्या. एक विकेट हातात शिल्लक असतानाही इंग्लंडने डाव घोषित केल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ब्रुकने या सामन्यात 15 चौकार आणि एक षटकार मारून या 89 धावा साकारल्या. अवघ्या 11 धावा कमी पडल्यामुळे त्याचे चौथे कसोटी शतक होता-होता राहिले. या खेळीदरम्यान ब्रुकचा स्ट्राईक रेट 110 होता. इंग्लंडने या पहिल्या डावात 5.57 च्या इकोनॉमी रेटने धावा केल्या. ब्रुकच्या मागच्या सहा कसोटी डावांचा विचार केला, तर त्याने 153, 87, 9, 108, 111 आणि 89 असे प्रदर्शन केले आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स काही दिवासंपूर्वी ब्रुकची तुलना विराटशी करताना दिसला होता. आता ब्रुक स्टोक्सच्या या वक्तव्यावर खरा उतरताना दिसू लागला आहे.
कसोटी कारकिर्दीतील हॅरी ब्रुकचा हा पाचवा सामना ठरला. मागच्या सात कसोटी डावांमध्ये ब्रुकने तब्बल 569 धावा केल्या आहेत आणि दिग्गजांच्या यादीत जागाही पक्की केली. कसोटी पदार्पणानंतर पहिल्या सात डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ब्रुक आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. यादीत पहिल्या क्रमांकावर भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी () आहे, ज्याने पहिल्या सात कसोटी डावांमध्ये 673 धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज कॅमरॅड हंटे (Conrad Hunte) आहेत, ज्यांनी 577 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर 573 धावांसह पाकिस्तानचे जावेद मियादाद (Javed Miandad) आहेत. आता या दिग्गजांच्या यादीत 569 धावांसह ब्रुक चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
कसोटी पदार्पणानंतर पहिल्या सात डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
673 – विनोद कांबळी
577 – कॅमरॅड हंटे
573 – जावेद मियादाद
569 – हॅरी ब्रुक
हॅरी ब्रुक याने या मालिकेआधी पाकिस्तान दौरा देखील चांगलाच गाजवला. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये तीन शतक आणि एक अर्धशतक ठोकले. परिणामी यजमान संघाला तीन पैकी एकही सामना जिंकता किंवा अनिर्णित करता आला नाही. डिसेंबर 2022 मध्ये आगामी आयपीएल हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने ब्रुकची गुणवत्ता पारखून त्याला संघात घेण्यासाठी तब्बल 13.25 कोटी रुपये खर्च केले. आयपीएल 2023 मध्ये त्याच्या प्रदर्शनावर चाहत्यांचे आणि जाणकारांचे लक्ष असेल. (Harry Brook scored 89 runs in the first Test against New Zealand and earned a place in the special list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी संघ कोण निवडणार? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
वेगवान गोलंदाजांचा कारखाना! पीएसएलमध्ये पाच विकेट्स घेत युवा खेळाडूने ठोठावले पाकिस्तान संघाचे दरवाजे