आयपीएल 2023च्या 19व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आमना सामना झाला. इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक हसनरायझर्स हैदराबादसाठी मॅच बनर ठरला. आयपीएल 2023 मधील पहिले शतक ब्रुकच्या बॅटमधून निघाले आणि त्याने आपली गुणवत्ता देखील सिद्ध केली. काही दिवसांपासून ब्रुकसारखा महागडा खेळाडू धावा करत नसल्याने सोशल मीडियावर चाहते नाराजी व्यक्त करत होते. पण सामना संपल्यानंतर या टीकाकारांचे तोंड मी बंद केले, असे ब्रुक म्हणाला.
आयपीएल 2023 पूर्वी हॅरी ब्रुक (Harry Brook) याने इंग्लंडसाठी जबरदस्त प्रदर्शन केले होते. याच पार्श्वभूमीवर आयपीएल लिलावात त्याला खरेदी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. सनरायझर्स हैदराबादने ब्रुकवर तब्बल 13.25 कोटी रुपये खर्च करून त्याला संघात घेतले. पण हंगामातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही. पहिल्या तीन सामन्यातील प्रदर्शनामुळे ब्रुक टीकाकारांच्या निशाण्यावर आला होता. पण शुक्रवारी (14 एप्रिल) त्याने अवघ्या 55 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर नाबाद 100 धावा कुटल्या.
या वादळी खेळीच्या जोरावर ब्रुकने काही दिवसांपूर्वी त्याच्यावर टीकार कणाऱ्या नेटकऱ्यांची तोंडे बंद केली आहेत. विजयानंतर त्याला सामनावीर म्हणून निवडले गेले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ब्रुक म्हणाला, “माझ्यासाठी आजची रात्र खास आहे. मी कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. प्रेक्षकांची आवाज जबरदस्त होता आणि मीदेखील याचा आनंद घेतला. ही तीच लोक होती, जी काही दिवासंपूर्वी सोशल मीडियावर मला बरं वाईट बोलत होते. आज त्याच भारतीय चाहत्यांपैकी अनेकजण माझं कौतुक करत आहेत. काही दिवासंपूर्वी हेच लोक माझी मजा घेत होते. इमानदारीने सांगायचे तर मी या सर्वांचं तोंड बंद केलं आहे.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सनरायझर्स हैदराबानदे प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्स संघ 20 षटकात 7 बाद 205 धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी हैदराबादने हा सामना 23 धावांनी नावावर केला. (Harry Brooke hits back at Indian critics after scoring a century)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रुकने केला आयपीएल 2023 मध्ये शतकाचा शुभारंभ! पाहा प्रत्येक हंगामातील पहिल्या शतकवीरांची यादी
“तू स्वतःसाठी खेळतोय, क्रिकेटच तुला धडा शिकवेल”, गिलच्या संथ खेळीनंतर संतापला वीरू