इंग्लंडचा 23 वर्षीच फलंदाज हॅरी ब्रूक याने पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील शतक केले. इंग्लंड संघासोबत पाकिस्तानमध्ये दाखल झाल्यापासून ब्रूकला नशिबाची साथ मिळाली आहे. त्याने कसोटी मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांध्ये शतक केले होते आणि आता तिसऱ्या सामन्यात देखील शतक पूर्ण केले. रविवारी (18 डिसेंबर) कराची कसोटी सामन्यात त्याने शतक करताना काही खास विक्रम देखील नावावर केले.
इंग्लंड संघासाठी पाकिस्तानचा हा दौरा खास राहिला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या कसोटी मालिकेतील पहिले दोन्ही सामने इंग्लंडने जिंकले असून तिसऱ्या सामन्यात देखील संघ बाजी मारण्याच्या प्रयत्नात आहे. उभय संघांतील या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात हॅरी ब्रूक (Harry Brook) पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच चांगल्या लयीत होता. त्याने 133 चेंडूत 100 धावांचा टप्पा पार केला आणि सामन्यातून एकूण 111 धावांचे योगदान दिले. याआधी रावलपिंडी कसोटी सामन्यात ब्रूकने 153, तर मुल्तान कसोटी सामन्यात 108 धावांची खेळी केली होती.
ANOTHER ONE!! 💯
Third century of the tour for Brooky, he's been a run machine!
🇵🇰 #PAKvENG 🏴 pic.twitter.com/DsvuQkKcwv
— England Cricket (@englandcricket) December 18, 2022
ब्रूकची ही विदेशातील पहिली कसोटी मालिका असून यामध्ये त्याने जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. त्याने मालिकेतील तीन सामन्यांमध्ये सलग तीन शतके केली आहेत. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ओव्हल मैदानावर कसोटी पदार्पण केले होते. रविवारी त्याने कारकिर्दीतील चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात पाय टाकला आणि तिसरे कसोटी शतक देखील पूर्ण केले. कारकिर्दीतील पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये तीन शतके करणारा तो इंग्लंडचा पहिला, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सहावा फलंदाज टरला आहे.
कारकिर्दीतील पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये तीन किंवा त्यापेक्षा जास्त शतके करणारे फलंदाज
जॉर्ज हेडली, वेस्टइंडीज (4)
आर्थर मॉरिस, ऑस्ट्रेलिया (3)
कोनराड हंट, वेस्टइंडीज (3)
सुनील गावसकर, भारत (4)
मोहम्मद अजहरुद्दीन, भारत (3)
हैरी ब्रूक, इंग्लैंड (3*)
ब्रूकने या दौऱ्यातील तीन कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत 450 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशा प्रकारे तो इंग्लंडसाठी पहिल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने केएस रणजीत सिंग यांच्या 125 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. केएल रणजीत सिंग यांनी कारकिर्दीतील पहल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये 418 धावा केल्या होत्या. जामनगरचे महाराज कुमार रणजीत सिंग यांनी इंग्लंड संघाकडून एकूण 15 कसोटी सामने खेळले होते. (Harry Brook’s century in third consecutive Test against Pakistan he breaks Ranjit Singh’s record 125 years ago)
इंग्लंडसाठी कारकिर्दीतील पहिल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
465 हॅरी ब्रूक (12, 153, 87, 9, 108, 67*)
418 केएस रंनजीत सिंह (62, 154*, 8, 11, 175, 8*)
411 टिप फोस्टर (287, 19, 49*, 21, 16, 19)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार का? पत्रकार परिषदेत केएल राहुलने केला खुलासा
कसोटीमध्ये अक्षर पटेलचा बोलबाला, भारताच्या क्रिकेट इतिहासात केली कोरले आपले नाव