---Advertisement---

18 सामन्यात 97 विकेट्स! भारताच्या अ संघात संधी मिळालेला ‘हा’ खेळाडू आहे तरी कोण?

On: शनिवार, मे 17, 2025 9:43 PM
---Advertisement---

असं म्हणतात की संयमाचे फळ गोड असतं. कोणत्याही मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी माणसाने सतत मेहनत करत राहावे. कारण यश कधी दार ठोठावेल हे माहित नसते. महाराष्ट्रात जन्मलेला 22 वर्षीय स्टार गोलंदाज हर्ष दुबे (Harsh Dubey) देखील अशाच आशेने देशांतर्गत स्पर्धांमध्ये सतत मेहनत करत होता. पण, (16 मे) रोजी त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले, जेव्हा या युवा खेळाडूची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघात निवड झाली. हर्षची पहिल्यांदाच भारतीय अ संघात निवड झाली आहे. अशा परिस्थितीत, हर्षच्या चमकदार कामगिरीवर एक नजर टाकूया.

भारत अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात एक नवीन नाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 22 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज हर्ष दुबेने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. महाराष्ट्रातील पुणे येथे जन्मलेल्या हर्ष दुबेने डिसेंबर 2022 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. फक्त 3 हंगामात त्याने आपल्या गोलंदाजीने अशी जादू निर्माण केली की निवडकर्तेही त्याच्या प्रतिभेकडे दुर्लक्ष करू शकले नाहीत.

2024-25 चा रणजी करंडक हंगाम हर्षसाठी खूप खास होता. त्याने या हंगामात 69 विकेट्स घेऊन एक नवा रेकाॅर्ड केला. विदर्भाला रणजी विजेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या शानदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवडण्यात आले. हर्षने आतापर्यंत 18 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण 97 विकेट्स घेतल्या आहेत.

तो अलीकडेच सनरायझर्स हैदराबाद संघात दाखल झाला आहे, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. हर्ष दुबेची कठोर परिश्रम आणि प्रतिभा त्याला भारतीय क्रिकेटचा पुढचा स्टार बनवू शकते. आता सर्वांच्या नजरा इंग्लंड दौऱ्यातील त्याच्या कामगिरीवर आहेत.

अभिमन्यु ईश्वरन (कप्तान), ध्रुव जुरेल (उपकप्तान), यशस्वी जायसवाल, करुण नायर, नीतीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकुर, ईशान किशन, मानव सुथार, तनुष कोटियां, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कम्बोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड़, सरफराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे, शुभमन गिल और साई सुदर्शन (दोनों दूसरे मैच से उपलब्ध होंगे)।

इंग्लंड दौऱ्यावर भारताचा अ संघ- अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), ध्रुव जुरेल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन, मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, सरफराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे,

शुबमन गिल आणि साई सुदर्शन (दोघेही दुसऱ्या सामन्यापासून उपलब्ध होतील)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---