भारतीय टी२० कर्णधार रोहित शर्मा त्याच्या शानदार आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तीन द्विशतके झळकावणाऱ्या या खेळाडूच्या नावावर अनेक मोठे विक्रम त्याच्या नावे असून, संपूर्ण जगभरात त्याचे चाहते आहेत. मात्र, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या खेळाचे इतके चाहता बनले आहेत की, त्यांनी तिला रोहितपेक्षा चांगला फलंदाज म्हटले.
ही अभिनेत्री सयामी खेर असून, अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलेली सयामी सोशल मीडियावर तिच्या क्रिकेट व्हिडिओंमुळे अनेकदा चर्चेत असते. हर्ष गोएंकाच नव्हेतर, भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा अष्टपैलू युवराज सिंगही तिच्या फलंदाजीचा चाहता आहे.
अलीकडे, सयामीने तिच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती चित्रपटाच्या सेटवर फलंदाजी करताना दिसत आहे. कमेंट करताना चाहत्यांनी तिचे चांगलेच कौतुक केले. मात्र, दरम्यान, गोएंका ग्रुपचे मालक हर्ष गोएंक यांनी कमेंट करत लिहिले की, ‘तुम्ही रोहित शर्मापेक्षा चांगली फलंदाजी करत आहात.’
Shooting for Breathe. Love the team. Long breaks in between shots = Cricket on set. @hvgoenka thanks to the ceat bat my gully cricket looks alright. pic.twitter.com/bAEmHabmx4
— Saiyami Kher (@SaiyamiKher) November 21, 2021
याआधीही सयामी खेरने स्वत: क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ ट्विट केला होता. व्हिडिओमध्ये, सयामी फ्रंट फूटचे फटके खेळताना दिसत आहे आणि या फटक्यांवर युवराज सिंग खुश झाला होता. त्याने कमेंट करताना सयामीच्या फूटवर्कचे कौतुक केले होते.
सयामीने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासाठी क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळले आहे. तीला राष्ट्रीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून निवडीसाठी देखील बोलावण्यात आले होते, तरीही तीने अभिनय करण्याचे ठरवले होते आणि तेच केले. सयामीने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात मिर्झीया या चित्रपटामधून केली होती. या चित्रपटातून अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने पदार्पण केले होते. सयामीने तेलुगु चित्रपट रे मध्येही काम केले आहे. अभिनयापूर्वी तिने मॉडेलिंगही केले होते. तिला क्रिकेटमध्येही रस आहे आणि ती वेगवान गोलंदाजीही करते. सयामीला सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळायचे आहे. सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करण्याचे तिचे स्वप्न आहे.






