भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या आपल्या कारकीर्दीतील सर्वात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आजकाल सर्वांच्या तोंडात सूर्याचेच नाव झळकत आहे. त्यातच सूर्याची प्रशंसा करणारे क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांना एका चाहत्याने ट्रोल करण्याचा प्रयत्न केेला. मात्र, त्या चाहत्याला हर्षा भोगले यांच्या कडून जशास तसे उत्तर मिळाले, ज्याने त्याची बोलती बंद झाली.
एका चाहत्याने ट्वीट करत हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांना विनंती केली की या खेळाडूची जास्त स्तुती करु नका. ऋषभ पांडे नावाच्या या चाहत्याने सूर्यकुमारला नजर लागू नये म्हणून अशी विनंती केली. तो ट्वीट करत म्हणाला की,”प्लिझ हर्षा भोगले, सूर्यकुमार यादव याची जास्त स्तुती करु नका. जर त्याला तुमची नजर लागली, तर पूर्ण देश तुमच्या मागे लागेल.” त्यानंतर हर्षा भोगले या ट्वीटवर प्रतिक्रिया देत म्हणाले की,”शेवटी मी समालेचक आहे. मी कोणता मांत्रिक नाही आणि मला गोष्टी जशा घडल्या आहेत, तशाच सांगाव्या लागतात.”
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने आपला पहिला आतंरराष्ट्रीय सामना मार्च, 2021 मध्ये खेळला होता. सूर्याने आता पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण 13 एकदिवसीय आणि 41 टी20 सामने खेळले आहेत. सूर्याने आतापर्यंत 41 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 39 डावात त्याने 45च्या सरासरीने 1395 धावा केल्या, ज्यात त्याचा स्ट्राईक रेट 180 पेक्षा जास्त होता. सूर्याने या दरम्यान 2 शतके आणि 12 अर्धशतके लगावली आहेत.
सध्या सूर्यकुमार न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझालंड विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात त्याने धमाकेदार अर्धशतक झळकावले. त्याने 51 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 111 धावा केल्या. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात दुसरे शतक होते.(Harsha Bhogle gave strong reply on fans comment)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट की बाबर, विलियम्सनच्या मते कुणाचा कव्हर ड्राईव्ह सगळ्यात भारी? घ्या जाणून
‘कधी-कधी तर आम्ही पॉवरप्लेमध्येच हरतो’, भारताच्या खेळाडूचीच कबुली