ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका महिला क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. खरं तर, महिला बिग बॅश लीग स्पर्धेच्या 8व्या हंगामातील साखळी सामने रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) सिडनी थंडर विरुद्ध ऍडलेड स्ट्रायकर्स या सामन्याने संपले. या सामन्यात ऍडलेडने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक दिली. दुसरीकडे, सिडनी थंडर या हंगामातून बाहेर पडले. याव्यतिरिक्त सिडनी थंडरची कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला फलंदाज रचेल हेन्स हिने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. खरं तर, रचेलने सप्टेंबरमध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. मात्र, ती या महिला बीबीएलमध्ये शेवटच्या सामन्यात मैदानावर उतरली होती.
रचेल हेन्सची प्रतिक्रिया
रचेल हेन्स (Rachael Haynes) हिने तिच्या निवृत्तीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तिने म्हटले आहे की, “मला माहिती आहे की, मी जाण्यासाठी तयार आहे, पण हा क्षण असा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही केले, ज्यापासून तुम्ही दूर जात आहात. हा निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण होते, पण कधी ना कधी मला क्रिकेट सोडायचेच होते.”
https://twitter.com/AusWomenCricket/status/1594268966071205888
https://twitter.com/7Cricket/status/1594260284255764480
रचेल हेन्सची कामगिरी
रचेल हेन्स हिच्या महिला बीबीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर तिने यामध्ये 99 सामने खेळले आहेत, ज्यात तिने 104.8च्या स्ट्राईक रेटने 2142 धावा चोपल्या आहेत. रचेल ही महिला बीबीएलचा सुरुवातीच्या हंगामापासून सिडनी थंडरचा भाग होती. तसेच, तिच्या नेतृत्वात सिडनीने 2020-21 या हंगामाचे विजेतेपदही पटकावले होते.
https://twitter.com/7Cricket/status/1594265931730997252
याव्यतिरिक्त ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावरही ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू राहिली आहे. तिने 2009मध्ये पदार्पण केले होते. रचेलने तिच्या कारकीर्दीत एकूण 6 कसोटी, 77 वनडे आणि 84 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. सन 2018नंतर रचेल ऑस्ट्रेलिया महिला संघाची उपकर्णधार होती. यादरम्यान तिने संघाला टी20 विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका साकारली होती. (former australia batter rachael haynes retires from wbbl know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट की बाबर, विलियम्सनच्या मते कुणाचा कव्हर ड्राईव्ह सगळ्यात भारी? घ्या जाणून
‘तो सर्वत्र आहे’, धोनीबद्दल विराट कोहलीने केलेल्या पोस्टने इंटरनेटवर एकच खळबळ; एकदा पाहाच