---Advertisement---

KKR vs GT: हर्षा भोगले यांनी का टाळलं काॅमेंट्री? सोशल मीडियावर दिलं स्पष्टीकरण

On: मंगळवार, एप्रिल 22, 2025 3:42 PM
Harsha-Bhogle
---Advertisement---

आयपीएल 2025 मध्ये, 21 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. केकेआर विरुद्ध जीटी सामन्यादरम्यान प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले समालोचन पॅनेलचा भाग नव्हते. सामन्यापूर्वी अशा बातम्या आल्या होत्या ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की त्यांना या सामन्यासाठी समालोचनातून काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान, हर्षा भोगले यांनी त्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. सोमवारी केकेआर आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान त्यांनी समालोचन का केले नाही हे भोगले यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.

केकेआर विरुद्ध जीटी सामन्यापूर्वी, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की हर्षा भोगले आणि सायमन डौल यांना बंगाल क्रिकेट असोसिएशनने कमेंट्री पॅनलमधून काढून टाकले आहे. केकेआरच्या घरच्या सामन्यांमध्ये या दोन्ही समालोचकांना समालोचनासाठी पाठवू नये अशी विनंती सीएबीने बीसीसीआयला केली होती. खरंतर हर्षा भोगले आणि सायमन डौल यांनी सांगितले होते की ईडन गार्डन्समधील क्युरेटर घरच्या संघाला पाठिंबा देत नाहीये, अशा परिस्थितीत केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नवीन घरचे मैदान शोधले पाहिजे. या विधानावरून सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला.

सोशल मीडियावर, एक्स या प्लॅटफॉर्मवर हर्षा भोगले यांनी एक पोस्ट टाकून स्पष्ट केलं की, या हंगामात त्यांना केवळ दोन कोलकात्याचे सामने समालोचनासाठी देण्यात आले होते. त्यापैकी एक सामन्यात त्यांनी समालोचन केलं, पण दुसऱ्या सामन्यासाठी ते कौटुंबिक कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत.

भोगले म्हणाले की, “काल कोलकात्यात झालेल्या सामन्यात मी का नव्हतो यावर खूप चर्चा सुरू आहे. पण मी त्या सामन्याच्या समालोचन पॅनेलमध्ये होतोच नाही. जर मला विचारलं असतं, तर हा गोंधळच झाला नसता.”

ते असंही म्हणाले की, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच कोणत्या समालोचकाला कोणते सामने मिळणार हे ठरवले जाते. कोलकात्यातील दोन सामन्यांसाठी त्यांचं नाव होतं – एक सामन्यात ते होते, दुसऱ्यासाठी येऊ शकले नाहीत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---