सुप्रसिद्ध समालोचक आणि क्रिकेटचे जाणकार हर्षा भोगले (harsha bhogle) यांनी २०२१ वर्षातील क्रिकेपटूंच्या प्रदर्शनाचा आढावा घेतला आहे. त्यांनी यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले आहे आणि त्यांची यावर्षीची सर्वोत्तम कसोटी प्लेइंग इलेव्हन तयार केली आहे. त्यांनी निवडलेल्या संघात तीन भारतीय खेळाडूंचा तर, दोन पाकिस्तानी खेळाडूंचा देखील समावेश आहे. त्याव्यतिरिक्त श्रीलंका, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या संघांतील प्रत्येकी एका खेळाडूंला त्यांनी संघात निवडले आहे.
हर्षा भोगलेंनी निवडलेल्या संघात सलामीवीराच्या भूमिकेत भारतीय दिग्गज रोहित शर्मा आणि श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने यांना सामील केले गेले आहे. रोहित शर्माने या संपूर्ण वर्षात भारतीय संघासाठी सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे. यावर्षा पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कसोटी शतक देखील केले होते. तर दुसरीकडे दिमुथ करुणारत्नेचा विचार केला, तर त्यानेही सतत चांगला खेळ केला आहे.
हर्षा भोगलेंनी तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅब्युशेनला निवडले आहे. त्याने या संपूर्ण वर्षात ऑस्ट्रेलिया संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तो यावर्षी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज देखील ठरला आहे. भोगलेंच्या संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटला निवडले गेले आहे. रूटने इंग्लंड संघासाठी एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्यात विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे.
पाचव्या क्रमांकावर भोगलेंनी पाकिस्तानच्या फवाद आलमला निवडले आहेत. फवादने अलिकडच्या काळात पाकिस्तान संघात पुनरागमन केले आणि उत्कृष्ट प्रदर्शन करून दाखवले आहे. त्याने पाकिस्तानसाठी खेळलेल्या ९ कसोटी सामन्यांमध्ये ५७१ धावा केल्या आहेत. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला देखील या संघात सामील केले गेले आहे. पंतने यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी महत्वपूर्ण प्रदर्शन करून दाखवले होते.
भोगलेंनी त्यांच्या कसोटी संघात अष्टपैलूच्या रूपात वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार जेसन होल्डरला निवडले आहे. तसेच फिरकी गोलंदाजाच्या रूपात रविचंद्रन अश्विनला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये त्यांनी पाकिस्तानच्या शाहीन शाह अफ्रिदी, दक्षिण अफ्रिकेच्या एन्रिक नॉर्किए आणि न्यूझीलंडच्या कायले जेमिसनला सामील केले आहे.
हर्षा भोगलेंची २०२१ मधील सर्वोत्तम कसोटी प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने, मार्नस लॅब्युशेन, जो रूट, फवाद आलम, रिषभ पंत, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, शाहीन शाह अफ्रिदी, एन्रिक नॉर्किए व कायले जेमिसन.
महत्वाच्या बातम्या –
हार्दिक पंड्याची चाहत्यासोबतची वर्तवणूक पाहून नेटकरी ‘गुश्श्यात’, म्हणाले, ‘भाऊ जुणे दिवस विसरला’
SAvsIND, Live: राहुल-विराटने सावरला डाव; चहापानापर्यंत भारत २ बाद १५७
विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय ते मेरी कोम-ऑलिम्पिक, २०२१ वर्षात भारतीय क्रीडाविश्वात गाजले हे १० वाद
व्हिडिओ पाहा –