---Advertisement---

स्टोक्स मैदानावर वेळ वाया घालवत आहे, त्यानं कोरोनाची लस शोधली पाहिजे

On: बुधवार, जुलै 22, 2020 2:07 PM
---Advertisement---

मॅनचेस्टर। कोरोना व्हायरसदरम्यान क्रिकेटप्रेमींनी पुन्हा क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटण्यास सुरुवात केली आहे. ४ महिन्यांनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील कसोटी मालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील २ सामने उरकले आहेत.

यादरम्यान काही गोष्टी बदलताना दिसत आहेत. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसी अष्टपैलूंच्या कसोटी क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक पटकाविला आहे.

याबरोबरच दुसऱ्या कसोटी सामन्यातील स्टोक्सची (Ben Stokes) कामगिरी पाहून सर्वजण आश्यर्यचकित झाले. त्याची ही कामगिरी पाहून प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी मजेशीर ट्वीट केले आहे.

हर्षा (Harsha Bhogle) यांनी ट्वीट करत लिहिले, “स्टोक्सलाही यश मिळत आहे. मला वाटते की तो क्रिकेटच्या मैदानावर आपला वेळ वाया घालवत आहे. यावेळी तो ज्या फॉर्ममध्ये आहे, कदाचित त्याला कोविड व्हायरसची लस सापडेल.”

https://twitter.com/bhogleharsha/status/1285257943403778049

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर इंग्लंड संघाने दुसऱ्या कसोटीत ११३ धावांनी विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केले आहे. ३ सामन्यात आता १-१ अशी बरोबर झाली आहे.

इंग्लंडच्या विजयाचा हिरो स्टोक्सने फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात ३५६ चेंडूत १७६ धावांची खेळी केली आहे, तर दुसऱ्या डावात त्याने ५७ चेंडूंचा सामना करत ७८ धावांची खेळी केली. सोबतच त्याने सामन्यात ३ विकेट्सही घेतल्या आहेत

ट्रेंडिंग घडामोडी-

-टेन्शन वाढलं! क्रिकेटमधील उभारता सितारा सगल चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

-खुशखबर! कोहली आणि कंपनी आयपीएलपुर्वी खेळणार या देशाविरुद्ध ३ टी२० सामने?

-जर आयपीएल झाली तर नेपाळसह या ८ देशांना होणार करोडोंचा फायदा, कारणही आहे खास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---