---Advertisement---

RCB ने खरेदी केलेले DC चे ‘हे’ दोन धुरंदर यंदा संघाला जिंकून देऊ शकतात ट्रॉफी!

On: शनिवार, जानेवारी 23, 2021 1:30 PM
---Advertisement---

सध्या आयपीएलच्या आठही संघात चौदाव्या हंगामाची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक संघ या हंगामासाठी आपला संघ मजबुत करण्यात व्यस्त आहे. आयपीएल 2021 साठी होणार्‍या लिलावापूर्वी सर्व संघाना आपल्या संघातील कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या संघाची यादी 20 जानेवारीला जाहीर करायला सांगितली होती. त्यानंतर सर्व संघांनी आपल्या संघाच्या याद्या जाहीर केल्या होत्या.

त्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्याकडील दोन खेळाडू रॉयल चॅलेंजर्स संघासाठी बदली खेळाडू म्हणून दिले आहेत. आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी सर्व संघाना आपले खेळाडू 4 फेब्रुवारीपर्यंत आपापसात बदलून घेता येणार आहे. त्यामुळे दिल्ली संघाने आपल्या संघातील डॅनियल सॅम आणि हर्षल पटेल यांना बदली खेळाडू म्हणून बेंगलोर संघाला दिले आहेत.

हर्षल पटेल आणि डॅनियल सॅम हे दोन खेळाडू  बेंगलोर संघासाठी खूप महत्वाचे ठरू शकतात. कारण विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबी संघाने, यंदाच्या हंगामासाठी संघाची पुनर्बांधणी करण्यासाठी 10 खेळाडूंना आपल्या संघातून मुक्त केले आहे. त्यामध्ये काही अष्टपैलू खेळाडूसुद्धा बाहेर पडले आहेत. त्यामुळे या संघाने हर्षल पटेल आणि डॅनियल सॅम यांचा आपल्या संघात समावेश केला आहे.

हर्षल आणि डॅनियलची आयपीएल कामगिरी

हर्षल पटेलने आयपीएल स्पर्धेतील आतपर्यंत 48 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 46 विकेट्स प्राप्‍त केल्या आहेत. त्याचबरोबर तो फलंदाजी करू शकतो. तसेच ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. त्यासोबत आक्रमक खेळी करण्यासाठी सुद्धा ओळखला जातो. डॅनियल सॅमने आयपीएलमध्ये 40 सामन्यात 34 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर फलंदाजीत 446 धावा केल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्‍या बिग बॅश लीगमध्ये 10 अर्धशतके सुद्धा ठोकली आहेत.

त्यामुळे हे खेळाडू बेंगलोर संघाच्या आयपीएल चषक न जिंकण्याच्या नकोश्या विक्रमाला आयपीएल २०२१ मध्ये खंडित करू शकतात.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुक्त केलेले खेळाडू

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने चौदाव्या हंगामाच्या लिलावापूर्वी आपल्या संघातील 10 खेळाडूंना मुक्त केले आहेत. यामध्ये मोईन अली, शिवम दुबे, गुरकिरत सिंग मन, ऍरॉन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, इसरु उडाना, उमेश यादव, पार्थिव पटेल आणि डेल स्टेन यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर यंदाची आयपीएल स्पर्धा भारतात आयोजित करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न सुरू आहे. तसेच या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव 18 किंवा 19 फेब्रुवारीला चेन्नई येथे होवू शकतो

महत्त्वाच्या बातम्या-

चेन्नई सुपर किंग्स, याला संघात घ्या! अवघ्या ५१ चेंडूत शतक करणाऱ्या ‘त्या’ पठ्ठ्यासाठी नेटकऱ्यांची मागणी

पासा पलट गया! एकवेळ शास्त्रींना ट्रोल करणारे चाहतेच मागतायत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---