आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात आरसीबीने ५४ धावांनी विजय मिळवला आहे. आरसीबीच्या या विजयामध्ये गोलंदाज हर्षल पटेल याने मोलाचे योगदान दिले. हर्षलने या सामन्यात हॅट्रिक घेतली असून एकूण ४ विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच तो चालू हंगामातील हॅट्रिक घेणार पहिला आणि आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासातील १७ वा गोलंदाज ठरला आहे. त्याने या सामन्यात त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १७ धावा दिल्या. हॅट्रिक घेतल्यानंतर हर्षल पटेल मैदानावर धावत सुटला होता. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
१७ व्या षटकाच्या पहिल्या ३ चेंडूत हर्षलने घेतले ३ महत्वाचे बळी
मुंबई इंडियन्सला शेवटच्या चार षटकात विजयासाठी ६१ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि कीराॅन पोलार्ड हे दोन दमदार खेळाडू खेळपट्टीपर उपस्थित होते. यावेळी १७ षटाकात आरसीबीचा हर्षल पटेल गोलंदाजीसाठी आला. त्याने षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर हार्दिक पांड्या, कीराॅन पोरार्ड, आणि राहुल चाहर या तिघांना एकापाठोपाठ बाद केले आणि त्याची हॅट्रिक पूर्ण केली. यापूर्वी आयपीएलच्या भारतात खेळल्या गेलेल्या पहिल्या टप्प्यात मुंबईविरुद्ध खेळतानाच हर्षलने ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
हर्षल त्याची हॅट्रिक पूर्ण झाल्यानंतर आनंदात मैदानात धावत सुटला होता. त्याच्या आनंदार कर्णधार विराट कोहलीही सामील झाला आणि त्याच्या मागे धावू लागला. विराटने नंतर त्याला गाठले आणि दोघेही आनंद व्यक्त करताना दिसले. हर्षलच्या आनंदात याव्यतिरिक्त संघातील इतरही खेळाडू सामील झाले होते. हॅट्रिक पूर्ण झाल्यानंतर हर्षल आणि संघातील बाकीचे खेळाडू ज्याप्रकारे त्यांच्या आनंदात सहभागी झाले आणि मैदानावर धावत सुटले, त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
WHAT. A. MOMENT for @HarshalPatel23 👏👏#VIVOIPL #RCBvMI pic.twitter.com/tQZLzoZmj6
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021
मुंबईला १११ धावांवर गुंडाळले
दरम्यान, सामन्यात मागच्या वर्षीचा विजेता संघ मुंबई इंडियन्स १८.१ षटकात १११ धावा करून स्वस्तात गुंडाळला गेला. परिणामी या सामन्यात मुंबईला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स गुणतालिकेत १० पैकी ४ सामने जिंकत सातव्या स्थानावर घसरली आहे. तसेच आरसीबीने १० पैकी ६ सामने जिंकले असून संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ॲक्शनला रिॲक्शन! षटकार मारल्यानंतर खुन्नस देणाऱ्या भरतची विकेट घेऊन चाहरने केला असा जल्लोष
गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहचलेल्यानंतर सीएसकेचा कर्णधार धोनी म्हणतोय, आम्ही…
धमाका! पुढील वर्षीच्या आयपीएल लीलावात ‘या’ पुणेकरासह पाच प्रतिभावान खेळाडू होणार मालामाल