आयपीएल २०२२ चा लिलाव इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटनांपैकी एक असेल असे म्हटले जात आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे २०१८ प्रमाणेच फ्रँचायझीला जास्तीत जास्त तीन खेळाडूच कायम ठेवता येतील. तसेच आरटीएमद्वारे दोन खेळाडू परत आणता येतील. त्यामुळे प्रत्येक संघात मोठे बदल होतील.
तसेच, आयपीएल २०२२ च्या लिलावापूर्वी, दोन नवीन फ्रँचायझी लीगमध्ये सामील होतील. आयपीएल स्पर्धेत २०२१ च्या हंगामात दहा संघ सामील झाले होते. कोची टस्कर्स केरळ आणि पुणे वॉरियर्सने या दोन संघांनी त्या वर्षी स्पर्धेत प्रवेश केला होता. २०२२ आयपीएलपुर्वीही काहीशी तशीच परिस्थिती असणार आहे.
अनकॅप्ड खेळाडू आयपीएल स्पर्धेचे खास भाग राहिले आहेत. आयपीएलच्या लिलावात अनेक अनकॅप्ड क्रिकेटर्सनी मोठी कमाई केली आहे. तसेच कामगिरीही जबरदस्त केली आहे. खालील पाच खेळाडू आयपीएलच्या येत्या लिलावात बरीच रक्कम मिळवू शकतात.
५. चेतन सकारिया
आयपीएल २०२१ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने चेतन सकारियाला १.२ कोटींमध्ये करारबद्ध केले होते. सकारियाने पहिल्या हंगामात रॉयल्ससाठी उत्तम कामगिरी केली आहे. सीएसकेविरुद्ध खेळताना त्याने एमएस धोनीची मोठी विकेट घेतली. सकारियामध्ये क्रिकेट विश्वात मोठी छाप पाडण्याची क्षमता असलेला क्रिकेटपटू आहे. जर सौराष्ट्रचा हा वेगवान गोलंदाज अशीच कामगिरी करत राहिला तर त्याला २०२२ च्या आयपीएल लिलावात नक्कीच मोठा फायदा मिळू शकेल.
४. ऋतुराज गायकवाड
ऋतुराज गायकवाडने काही सामन्यात चांगली कामगिरी केली नव्हती, त्यावेळी चेन्नई सुपर किंग्सने त्याला चांगली साथ दिली आणि तो एक चांगला मास्टरस्ट्रोक ठरला. गायकवाड आयपीएलमध्ये सुपर किंग्जसाठी मॅच विनर म्हणून उदयास आला आहे. या उदयोन्मुख स्टारन खेळाडूने सलग तीन अर्धशतकांसह आयपीएल २०२० ची समाप्ती केली होती. सीएसकेचा सलामीवीर असलेल्या फाफ डु प्लेसिससोबत त्याने चांगल्या भागीदारी रचल्या. सीएसकेला त्याला सोडून देणे कठीण जाणार असले तरी संघात आणखी काही मोठी नावे आहेत त्यामुळे सीएसके गायकवाडला सोडू शकते. अनेक संघ आयपीएलच्या लिलावात २०२२ मध्ये ऋतुराजला आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करतील.
३. शाहरुख खान
शाहरुख खान हा काही मोजक्याच भारतीय फलंदाजांपैकी एक आहे, जो सातव्या आणि पाचव्या क्रमांकावर सातत्यपूर्ण कामगिरी करू शकतो. तामिळनाडूच्या या खेळाडूने आतापर्यंत आयपीएल २०२१ मध्ये पंजाब किंग्जसाठी जबरदस्त प्रदर्शन केले आहे. तो थोडा सातत्यात कमी पडला आहे कारण हा त्याचा पहिलाच आयपीएल हंगाम आहे. अनुभवासह, तो आपली प्रतिभा बनवेल आणि म्हणूनच इतर संघांची त्याच्यावर नजर असेल.
२. हर्षल पटेल
हर्षल पटेल आयपीएल २०२० पर्यंत दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. सध्या, हर्षल या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. ऋतुराज गायकवाडप्रमाणे, मेगा-लिलावाच्या नियमांमुळे पटेलला त्याचा संघ कायम ठेवू शकेल का याबद्दल शंका वाटते. एक गोष्ट निश्चित आहे की जर हर्षल लिलावात उतरला, तर तो सर्वात जास्त बोली लागणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूंपैकी एक बनू शकतो.
१. नितीश राणा
नितीश राणा आयपीएलमधील अव्वल कामगिरी करणाऱ्यांपैकी एक आहेत. त्याच्या कामगिरीत बऱ्याचदा सातत्य नसते पण जेव्हा तो आक्रमक खेळ करतो तेव्हा तो विरोधी गोलंदाजी लाइनअप बिघडवू शकतो. राणा सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा सदस्य आहे. जर तो २०२२ मध्ये लिलावात उतरला तर राणा दहापैकी कोणत्याही एका संघाकडून महत्त्वपूर्ण करार मिळवू शकतो. तसेच सर्वाधिक पैसे मिळणाऱ्या खेळाडूंमधे तो टॉप १५मधे नक्कीच असू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
हृदय जिंकलस! टीम इंडिया आधी आयपीएलमधील वैर नंतर; विराटची निराश झालेल्या इशान अन् रोहितशी भेट
वडिलाचे हाल लेकाला बघवले नाहीत, डिव्हिलियर्सला बाद होताना पाहून मुलाचा संताप, व्हिडिओ व्हायरल