भारतीय क्रिकेट संघाला ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. त्यानंतर ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू होईल. या दोन्ही मालिकांमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma)भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. तसेच या मालिकांमधून तो दुखापतीनंतर पुनरागमन करताना दिसेल. दरम्यान, त्याच्याबद्दल ३१ वर्षीय वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने (Harshal Patel)आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हर्षल पटेल म्हणाला, ‘जर त्याला तुमच्या गोलंदाजीतील क्षमतेबद्दल विश्वास असेल, तर तो तुमच्याकडे चेंडू सोपवतो आणि तो तुम्हाला हे सांगत नाही की, तुम्ही काय करायला हवे. तुम्हाला परिस्थितीची पूर्ण जाणीव असल्याने जा आणि आपले काम करा, असेच रोहितचे म्हणणे असते. याच गुणांमुळे तो चांगला कर्णधार आहे. मला अशा कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली खेळायला मजा येते.’
याबरोबरच हर्षलने सांगितले की, ‘माझ्याकडे अनेक योजना आहेत. ए, बी, सी असे. त्यामुळे जेव्हाही मला चेंडू दिला जातो, तेव्हा मला माहित असते की मला काय करायचे आहे. सामन्यावेळी मला बाहेरून आलेले सल्ले आवडत नाहीत आणि याबाबतीत रोहित शर्मा माझ्यासाठी एकदम फिट बसतो. तो तुम्हाला स्वातंत्र्य देतो आणि तुमचे काम करण्याची संधी देतो.’
गेल्यावर्षी न्यूझीलंडविरुद्ध टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या हर्षल पटेलने राहुल द्रविडबद्दल देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने राहुल द्रविडने त्याला पदार्पणावेळी दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितले.
अधिक वाचा – धोनीमुळे घडला ‘सलामीवीर’ रोहित, आता रोहितमुळे घडणार ‘हा’ फलंदाज; विंडीजविरुद्ध मिळणार नवी जबाबदारी
तो म्हणाला, ‘द्रविडने सांगितले की, मला माहित आहे, तू एक आत्मविश्वासू गोलंदाज आहे. तुला माहित आहे, तुला काय करायचे आहे. तू ते करू शकतो की नाही, ते तूच चांगलं जाणतो. मला फक्त इतकंच वाटतं की, तू मैदानात जावं आणि स्वत:ला व्यक्त करावं, या क्षणांचा आनंद घ्यावा.’
हर्षल पटेलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवडण्यास आले आहे. ही मालिका वनडे मालिकेनंतर १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हर्षलने यापूर्वी २ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून ४ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ईसीबीचा मोठा निर्णय! ऍशेस गमावल्याने ‘त्या’ व्यक्तीची केली हकालपट्टी
“मला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचंय”, युवा भारतीय खेळाडूने व्यक्त केली इच्छा