---Advertisement---

विंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेत होणार द्रविड – रोहितच्या नव्या अध्यायला सुरुवात, बीसीसीआय अध्यक्षांनी दिल्या शुभेच्छा

On: शुक्रवार, फेब्रुवारी 4, 2022 8:23 AM
Rahul-dravid-rohit-Sharma
---Advertisement---

येत्या ६ फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये वनडे (India vs west indies odi series) मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तरीदेखील ही मालिका निर्धारित वेळेत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड (Rahul Dravid)यांच्या नवीन प्रवासाला सुरुवात होत आहे. दरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड बद्दल भाष्य केले आहे.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयने विराट कोहलीला  वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित शर्माला वनडे संघाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर ही जबाबदारी राहुल द्रविड यांना देण्यात आली होती.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पोर्टस्टार सोबत बोलताना म्हटले की, “मी त्यांना शुभेच्छा देतो. आतापर्यंत त्यांची कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. मला विश्वास आहे ते नक्कीच भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करतील. मी भविष्यवाणी करू शकत नाही की, पुढे काय होईल, पण दोघांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा पुरेसा आत्मविश्वास आहे.”

बीसीसीआयने माहिती देत म्हटले होते की, शिखर धवन, नवदीप सैनी, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघातील सर्व खेळाडू ३१ जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये दाखल झाले होते.

असा आहे वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

महत्वाच्या बातम्या:

कॅरेबियन असूनही विवेकानंदांचे पुस्तक हाती घेत गेलने दाखवले भारतावरचे प्रेम, फोटो तुफान व्हायरल

चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत स्वीडनच्या येमेरचा सनसनाटी विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

धोनीमुळे घडला ‘सलामीवीर’ रोहित, आता रोहितमुळे घडणार ‘हा’ फलंदाज; विंडीजविरुद्ध मिळणार नवी जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---