न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केली. या मालिकेत भारताने न्यूझीलंडवर 3-0 ने मात केली. हर्षल पटेलने या मालिकेत 2 सामने खेळले आणि त्याने 7.28 च्या इकॉनॉमीसह 4 विकेट घेतल्या. यानंतर हर्षल पटेलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तो संघ प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत दिसत आहे.
हर्षलने या पोस्टवर कॅप्शन देत लिहिले आहे की, ‘पूर्वी आणि नंतर.’
https://www.instagram.com/p/CWpstc-vw_y/?utm_source=ig_web_button_share_sheet
या पोस्टमध्ये हर्षलने प्रशिक्षक राहुल द्रविडसोबतचे दोन फोटो पोस्ट केले आहेत, त्यातील एक 2004 सालातील आहे. यावेळी हर्षल त्यांच्याकडे क्रिकेट खेळायला शिकत होता आणि तिथे अनेक युवा खेळाडूंचे द्रविडसोबत खूप चांगले प्रस्थापित झाले आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्येही हर्षल द्रविड यांच्यासोबत उभा असल्याचे दिसते आहे. परंतु हा फोटो सध्याचा अर्थात 2021 मधील असल्याचे दिसते आहे.
द्रविडचे दीर्घकाळ भारत-ए संघाशी संबंध असण्याचे महत्त्वाचे कारण आहे. द्रविड हे भारतीय संघाचे प्रशिक्षक बनण्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष होते. त्यामुळे 19 वर्षांखालील भारतीय संघापासून ते भारत ए संघापर्यंतच्या प्रशिक्षणाची सूत्रे त्यांच्या हाती होती.
दुसरीकडे 2021 हे वर्ष हर्षल पटेलसाठी खूप चांगले राहिले आहे. हर्षल पटेलने याआधी 2021 च्या आयपीएल हंगामामध्येही चमकदार कामगिरी केली होती. या कामगिरीमुळेच हर्षल पटेल याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले आहे. आयपीएल 2021 मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्त्व करताना 15 सामन्यांमध्ये तब्बल 32 विकेट्स चटकावल्या होत्या. यासह तो या हंगामातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज राहिला. त्यामुळे त्याला पर्पल कॅप देऊन गौरविण्यात आले. याबरोबरच त्याच्या या कागमरीमुळे त्याला ‘पर्पल पटेल’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
वॉटसनने निवडले टी२० क्रिकेटमधील टॉप-५ फलंदाज, रोहित नव्हे ‘या’ भारतीयाला दिली जागा
श्रेयस अय्यरच्या वडीलांनी गेल्या ४ वर्षांपासून बदलला नव्हता व्हॉट्सअप डीपी, ‘हे’ होतं मोठं कारण