शनिवारी (९ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात १८ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना पुण्यात पार पडला. या सामन्यात बेंगलोरने ७ विकेट्सने विजय मिळवला. बेंगलोरच्या विजयात गोलंदाज हर्षल पटेलनेही महत्त्वाची भूमिका निभावली. त्याने या सामन्यात २ विकेट्स घेतल्या. मात्र, हा सामना सुरू असतानाच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक दु:खद घटना घडली आहे. त्याच्या कुटुंबातील महत्त्वाच्या सदस्याचे निधन झाले आहे, ज्यामुळे तो परत घरी गेला असल्याचे वृत्त समोर आले आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार हर्षलची बहिण अर्चिता पटेल हिचे शनिवारी निधन झाले. ही बातमी ऐकल्यानंतर लगेचच हर्षल आपल्या घरी परतला आहे. त्यामुळे आता तो त्याच्या बहिणीच्या अंत्यसंस्कारानंतर पुन्हा बेंगलोर संघात सामील होईल. यादरम्यान त्याला तीन दिवस बायोबबलमधून बाहेर राहावे लागणार आहे. तसेच असेही समोर येत आहे की, त्याच्या बहिणीचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे.
हर्षल पटेलच्या (Harshal Patel) भावंडांमध्ये अर्चिता ही सर्वात लहान होती. तसेच हर्षल तिच्या खूप जवळ होता. त्याचमुळे तो तिच्या निधनाचे वृत्त ऐकून लगेचच पुण्यातून अहमदाबादला रवाना झाला. आता तो पुन्हा कधी परत येणार आणि त्याला पुन्हा क्वारंटाईनचे नियम पाळावे लागणार का हे पाहावे लागेल.
हर्षलने आत्तापर्यंत बेंगलोरकडून चांगली कामगिरी केली आहे. त्याने ४ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो बेंगलोरचा मुख्य गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने गेल्या हंगामात दमदार कामगिरी करत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. त्याने २०२१ आयपीएल हंगामात बेंगलोरकडूनच खेळताना १५ सामन्यात ३२ विकेट्स घेतल्या होत्या, त्याचबरोबर पर्पल कॅपही नावावर केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022 | केव्हा आणि कुठे पाहाल राजस्थान वि. लखनऊ सामना, कशी असेल खेळपट्टी; जाणून घ्या सर्वकाही
IPL2022| कोलकाता वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल कोलकाता वि. दिल्ली सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही