न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ५ विकेट्सने जिंकत भारताने मालिकेची दमदार सुरुवात केली आहे. यानंतर शुक्रवार रोजी (१९ नोव्हेंबर) रांची येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये दुसरा टी२० सामना पार पडला. या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली. यासह त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या जागी हर्षलला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली आहे. सिराजला पहिल्या टी२० सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्याला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. मात्र त्याची ही दुखापत हर्षलच्या पथ्यावर पडली असून वयाच्या ३० व्या वर्षी हर्षलचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी त्याला पदार्पणाची कॅप दिली आहे. यासह हर्षल भारतीय टी२० संघाकडून पदार्पण करणारा ९४ वा क्रिकेटपटू बनला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आयपीएल २०२१ मध्ये हर्षल पटेल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीतच त्याला राष्ट्रीय संघाची कॅप मिळणे खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.
🎥 🎥 Congratulations to @HarshalPatel23 who is set to make his #TeamIndia debut. 👏 👏@Paytm #INDvNZ pic.twitter.com/n9IIPXFJQ7
— BCCI (@BCCI) November 19, 2021
हर्षलने आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्व करताना तब्बल ३२ विकेट्स चटाकवल्या आहेत. १५ सामने खेळताना त्याने या विकेट्स घेतल्या असून तो यंदाच्या हंगामातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट हंगाम राहिला आहे. त्याच्या एकंदर आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, त्याने एकूण ६३ सामने खेळताना ७८ विकेट्स घेतल्या आहेत.
टी२० क्रिकेटमध्ये एका संघाकडून सर्वात जास्त पदार्पण करणारे खेळाडू-
९८- ऑस्ट्रेलिया
९४- पाकिस्तान
९४- दक्षिण आफ्रिका
९४- भारत
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या टी२० सामन्यात निसर्ग देणार का साथ? असा आहे हवामानाचा अंदाज
ऐकलंत का! आयपीएलच्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने ‘या’ लीगमध्ये खरेदी केलेत संघ?