---Advertisement---

हर्षलच्या खिलाडूवृत्तीने जिंकली क्रिकेटशौकीनांची मने; अपील करण्याआधीच सोडले मैदान; पाहा व्हिडिओ

On: रविवार, नोव्हेंबर 21, 2021 10:37 PM
---Advertisement---

कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. भारतीय संघाने सलग तिसरा विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला. उत्कृष्ट सांगेल कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने मालिका खिशात घातली. मात्र, केवळ आपला दुसराच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या अष्टपैलू हर्षल पटेल याने केलेल्या एका कृतीने सर्वांची मने जिंकली.

रोहित शर्मा व ईशान किशन यांनी शानदार सलामी दिल्यानंतर भारतीय संघाने एकापाठोपाठ एक बळी गमावले. त्याचवेळी हर्षल पटेल फलंदाजी करत असताना एक मजेदार घटना घडली. १९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर फॉर्मात दिसणाऱ्या हर्षल पटेलने बाहेर जाणारा चेंडू फटकाण्याचा प्रयत्न केला. यात हर्षल यशस्वी होऊ शकला नाही.

https://twitter.com/CowCorner9/status/1462442915511238662?t=HmOdwMJQvvgsLq8dtfbyJQ&s=19

त्याचवेळी, चेंडू हुकल्यानंतर हर्षल गोलंदाज किंवा यष्टिरक्षकाच्या अपीलशिवाय पॅव्हेलियनच्या दिशेने जाऊ लागला. हर्षलला हे करताना पाहून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासह गोलंदाज आणि समालोचकांनाही आश्चर्य वाटले की हर्षल अपील केले नसतानाच पॅव्हेलियनमध्ये का जात आहे. नंतरच्या रिप्लेमध्ये हर्षल हिट-विकेट बाद झाल्याचे दिसून आले. यामुळे त्याने पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. हर्षलच्या या खिलाडूवृत्तीचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.

भारताने जिंकली मालिका
सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने ईशान किशनसह संघाला शानदार सुरुवात करून दिली. मधल्या फळीत युवा वेंकटेश अय्यर व खालच्या फळीत दीपक चहर यांनी उपयुक्त फटकेबाजी करत संघाला १८४ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही व त्यांना सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---