भारतीय क्रिकेट संघात खेळण्यासाठी आजकाल खूप मोठी स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक युवा खेळाडू आपली प्रतिभा ठिकठिकाणी दाखवत असतात. त्यातील एक युवा खेळाडू म्हणजे उमरान मलिक. उमरानला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत संघात घेतले असले तरी त्याला अद्याप संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, दुसरीकडे हर्षल पटेलला सातत्याने संघात स्थान मिळत आहे. हर्षल पटेलने यामागील गुपित उलघडण्याचा प्रयत्न केला आहे.
हर्षल पटेल म्हणाला की, “बॉलर म्हणून माझे काम त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहणे आहे. तुमच्याकडे १५ प्रकारच्या योजना असू शकतात परंतु एखाद्या दिवशी दडपण आल्यास तुम्ही मैदानावर आत्मविश्वासाने योजना राबवू शकत नसाल तर सर्व गोष्टी तुमच्या अनुकूल होणार नाहीत. मी वेगाची काळजी करत नाही कारण मी उमरान मलिकसारखा वेगवान गोलंदाजी करू शकत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला प्रभावी बनवण्यासाठी मला कौशल्य विकसित करावे लागेल. मी कधीही तुफान गोलंदाज नव्हतो पण मी सुमारे १४० किमी प्रतितास वेग गाठू शकतो. माझे लक्ष नेहमीच माझ्या गोलंदाजीचे कौशल्य विकसित करण्यावर असते आणि या काळात मी माझ्या गोलंदाजीच्या मजबूत आणि कमकुवत बाजूंवर लक्ष केंद्रित करतो.”
हर्षलच्या गोलंदाजीच्या शैलीला हळुवार खेळपट्ट्या अधिक अनुकूल आहेत, जसे की दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये दिसून आले, तर फिरोजशाह कोटलावरील पहिल्या सामन्यात तो महागडा ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी२० च्या पूर्वसंध्येला हर्षल म्हणाला की, “खरे सांगायचे तर, गेल्या दोन वर्षांपासून (आयपीएलमध्ये) लोक मी कशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रतिस्पर्धी गोलंदाज जितका जास्त खेळतील, तितक्याच त्यांना गोलंदाजाची भक्कम बाजू आणि गोलंदाजीची पद्धत काय आहे हे लक्षात येईल.”
दरम्यान, हर्षल पटेलकडे उमरान मलिकसारखा वेग नाही आणि त्याला वाटते की आंतरराष्ट्रीय कारकीर्द लांबणीवर टाकण्यासाठी त्याला त्याच्या खेळातील ‘वैविध्य’ सतत विकसित करावे लागेल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषकानंतर भारतात पदार्पण करणाऱ्या हर्षलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा महिन्यांहून अधिक कालावधीत ११ सामन्यांत १९.५२ च्या सरासरीने १७ बळी घेतले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऋतुराजच्या फलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फिदा, म्हणाला ‘तो जबरदस्त गुणवंत खेळाडू आहे’
‘मला माहिती असते तर मीच उपाय शोधला नसता का?’, पत्रकारांच्या प्रश्नावर नॉर्किया भडकला
‘अर्शदीप डेथओव्हर्स मध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो’, आशिष नेहराने टीम इंडियाला दिल्ला मोलाचा सल्ला