पुणे। काल(7 जानेवारी) 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने विजय मिळवत मानाची चांदीची गदा पटकावली. म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीर आणि लातूरच्या शैलेश शेळके या दोन कुस्तीगिरांमध्ये 63 व्या महाराष्ट्र केसरीची किताबी लढत पार पडली.
या लढतीत हर्षवर्धनने शेवटच्या दीड मिनिटात पट काढण्याचा प्रयत्न करून 3-2 अशा फरकाने लातूरच्या शैलेश शेळकेला पराभूत केले. त्यामुळे हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्र केसरी होणारा नवा पैलवान ठरला.
हर्षवर्धन आणि शैलेश हे दोघेही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील शिष्य आहेत.
त्यामुळे या दोघांमध्ये आखाड्याबाहेर चांगली मैत्री आहे. विशेष म्हणजे काल सामना संपल्यानंतर लेगचच हर्षवर्धनने आपला मित्र व कालच्या अंतिम लढतीचा प्रतिस्पर्धी शैलेशला खांद्यावर उचलून घेत स्टेजला फेरी मारत आनंद व्यक्त केला.
हर्षवर्धनने दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीचे त्याने मिळवलेल्या विजयाबरोबरच सध्या महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.
अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी याबद्दल पोस्ट करत हर्षवर्धनच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले आहे. तसेच हर्षवर्धनने शैलेशला उचलून घेतल्याच्या क्षणांचे फोटो सध्या व्हायरलही होत आहेत.
सोशल मीडियावर असे झाले हर्षवर्धन सदगीरच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक –
#महाराष्ट्रकेसरी #हर्षवर्धन_सदगीर या कुस्तीपटूचे हार्दिक अभिनंदन.💐💐
कुस्ती संपताच विजेत्या हर्षवर्धनने आपल्याच उपविजेत्या दोस्ताला खांद्यावर घेऊन खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.
काकासाहेब पवार यांच्यासाठी आजचा दिवस नक्कीच खास.👌👌#कुस्ती #MaharashtraKesari2020 #MaharashtraKesari pic.twitter.com/Agn9g8u6y4— Prajakta Abasaheb Godase (@GodasePrajakta) January 7, 2020
कुस्तीत दोस्ती नाही आणि दोस्तीत कुस्ती नाही!
महाराष्ट्र केसरी विजेता पै.हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेता पै.शैलेश शेळके यांचे अभिनंदन!विजेत्या हर्षवर्धन सदगीर याने उपविजेत्या शैलेश शेळके याला खांद्यावर घेऊन मैदानाला फेरी मारली आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले.#MaharashtraKesari2020 pic.twitter.com/iA1kMupCln
— Swapnil Dhawale Patil – स्वप्निल ढवळे पाटील (@iswapnildhawale) January 7, 2020
हे असं फक्त महाराष्ट्राच्या भूमीतच पाहायला मिळत.
विजयी मल्ल पराभूत मल्लाला खांद्यावर घेऊन आखाड्यात मिरवतो, याच खिलाडू वृत्तीला 'बडे दिलवाला' म्हणतात!विजयी पैलवान महाराष्ट्र केसरी #हर्षवर्धन_सदगीर व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान शैलेश शेळके यांचे अभिनंदन. #MaharashtraKesari2020 pic.twitter.com/sjCuwOOCnp
— Sachin Adgaonkar🇮🇳 (@sadg243) January 7, 2020
कुस्तीत दोस्ती नाही आणि दोस्तीत कुस्ती नाही.#MaharashtraKesari2020 pic.twitter.com/v9vJNFYbu1
— Yogesh sanas (@Yogeshesanas) January 7, 2020
#MaharashtraKesari2020 #महाराष्ट्रकेसरी अभिनंदन…🙏 pic.twitter.com/VaQm0xTmJ7
— tanaji godhade (@tanaji_prem) January 7, 2020
🦁 हरला म्हणून काय झालं❓ ….तो हरला म्हणून तर मी जिंकलो……
पराजीत झालेल्या ला देखील खांद्यावर घेऊन सन्मान करणे हीच आमच्या महाराष्ट्रची शिकवण आहे ……💐🤼♀
❣ महाराष्ट्र केसरी ❣🕊 अबोल…#MaharashtraKesari2020 pic.twitter.com/n585iKKv83
— टिव-टिव 🐦 (@hungry_devil_7) January 7, 2020
कुस्तीत दोस्ती नाही आणि दोस्तीत कुस्ती नाही !
हे दोन्ही पैलवान एकाच म्हणजे वस्ताद काकासाहेब पवार यांच्या तालमीतील आहेत.विजेत्या हर्षवर्धन सदगीर याने उपविजेत्या शैलेश शेळके याला खांद्यावर घेऊन मैदानाला फेरी मारली खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले#MaharashtraKesari2020 pic.twitter.com/tJibn5hiHu— Amit Dilip Shinde (@ashinde72) January 7, 2020
खेळाडूवृत्तीचे अनोखं उदाहरण! 💯
हर्षवर्धन सदगीर ह्यांनी शैलेश शेळके ह्यांच्यावर विजय मिळवून आनंद साजरा करण्यासाठी त्यांचेच मित्र शैलेश शेळके ह्यांना खांद्यावर घेतलं! 😍❤️#MaharashtraKesari2020 pic.twitter.com/JyTGHP60sA— प्रतिक जाधव // Pratik Jadhav (@PratikJ01) January 7, 2020
संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी
वाचा👉https://t.co/wHVogY3hfX👈#Kusti #maharashtrakesari #म #मराठी #MaharashtraKesari2020— Maha Sports (@Maha_Sports) January 7, 2020
अशी आहे महाराष्ट्र केसरी २०२०ची विजेतेपदाची गदा
https://t.co/Fb59lOBvOW#Kusti #maharashtrakesari #म #मराठी #MaharashtraKesari2020— Maha Sports (@Maha_Sports) January 7, 2020