पर्थ कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ जारी आहे. आज भारतीय गोलंदाजीदरम्यान मैदानावर एक मजेशीर घटना घडली. कर्णधारानं डीआरएस घ्यावा यासाठी गोलंदाजानं त्याला विविध पद्धतीनं विनवणी केल्याचं तुम्ही याआधी पाहिलं असेल. मात्र आता भारतीय गोलंदाज हर्षित राणानं एक वेगळच कृत्य केलं. राणानं कर्णधार जसप्रीत बुमराहला डीआरएस (डिसिजन रिव्ह्यू सिस्टम) कॉल घेण्यासाठी चक्क शपथच घेतली!
हर्षित राणा स्टीव्ह स्मिथविरुद्ध चांगली गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीत एक चेंडू फ्लिक करताना तो थेट स्मिथच्या पॅडवर आदळला. हर्षितला वाटलं की चेंडू समोरून आदळला होता, पण चेंडू लेग स्टंपला मिस करत होता. यासाठी डीआरएस घेण्यात आला, ज्याचा फायदा भारतीय संघाला झाला नाही. डीआरएस घ्यायच्या आधी हर्षित राणा बुमराहला म्हणाला होता की, तो शपथ घेऊन सांगतो चेंडू समोर लागला आहे.
वास्तविक, हर्षित राणा दुसऱ्या डावात भारतासाठी 17वं षटक टाकण्यासाठी आला. त्यानं पहिल्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथला जवळपास आऊट केलं होतं. हर्षितचा एक चेंडू खाली राहिला ज्यामुळे स्मिथचा फ्लिक शॉट चुकला आणि चेंडू पॅडला लागला. यावर हर्षित आणि संपूर्ण संघानं जोरदार अपील केलं, परंतु अंपायरनं स्मिथला आऊट दिलं नाही. यानंतर हर्षित राणानं कर्णधार बुमराहला कसं तरी पटवून डीआरएस घ्यायला लावला. त्यासाठी हर्षितनं चक्क स्वत:ची शपथ घेतली होती!
डीआरएस घेण्यापूर्वी हर्षित राणानं बुमराहकडे पाहिलं आणि म्हणाला की चेंडू समोर लागला आहे. यावर विराट कोहलीही म्हणाला की चेंडू समोर आहे. मात्र जसप्रीत बुमराह म्हणाला की चेंडू बाहेर जात आहे. त्यानंतर हर्षित राणा पुन्हा म्हणाला की मी स्वत:ची शपथ घेतो. अखेर बुमराहनं डीआरएस घेतला. तिसऱ्या अंपायरनं अल्ट्रा एज तपासलं आणि नंतर ट्रॅकिंगवरून समजलं की चेंडू लेग स्टंपला मिस करत आहे. अशा स्थितीत स्मिथ नाबाद राहिला आणि भारतानं रिव्ह्यूही गमावला. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
🗣️ #HarshitRana: Kasam se bhaiyaa, bahot saamne hai! 😂
This iconic line always convinces boys in India to go for the review! 💪#AUSvINDOnStar 👉 1st Test, Day 4, LIVE NOW! #AUSvIND #ToughestRivalry pic.twitter.com/h0WPe7idmU— Star Sports (@StarSportsIndia) November 25, 2024
हेही वाचा –
अवघ्या 7 धावांत संपूर्ण संघ ऑलआऊट! टी20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या
अब्दुल समदपासून नेहाल वढेरापर्यंत, मेगा लिलावात या अनकॅप्ड खेळाडूंना मिळाले कोट्यावधी रुपये!
आयपीएल चॅम्पियन कर्णधाराला खरेदीदार सापडला नाही, हे स्टार खेळाडूही अनसोल्ड!