---Advertisement---

शाहरुख खाननं केलं बीसीसीआयला ट्रोल, ट्रॉफी जिंकल्यानंतर मैदानावर दिलं ‘फ्लाइंग किस’; पाहा VIDEO

On: सोमवार, मे 27, 2024 11:26 AM
---Advertisement---

रविवारी, 26 मे रोजी चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध फायनल जिंकल्यानंतर संपूर्ण कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं ‘फ्लाइंग किस’ सेलिब्रेशन केलं. हे सेलिब्रेशन संघाचा गोलंदाज हर्षित राणामुळे चर्चेत आलं आहे.

जेव्हा संपूर्ण केकेआर फ्रँचायझी आयपीएल ट्रॉफीसह फोटो काढण्यासाठी एकत्र जमली, तेव्हा संघाचा मालक आणि बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने टीमला हर्षित राणाच्या फ्लाइंग किस सेलिब्रेशनसह पोझ देण्यास सांगितले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

आयपीलच्या साखळी सामन्यात ‘फ्लाइंग किस’ च्या सेलिब्रेशन मुळे हर्षित राणावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. पण आता मात्र फायनल सामन्यानंतर संपूर्ण केकेआर संघाकडून ‘फ्लाइंग किस’ जोरदार सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले. हर्षित राणाने या हंगामात केकेआर साठी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यानं 13 सामन्यात 9.08 इकाॅनोमीनं 19 विकेट्स घेतल्या आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपदाच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादवर आठ गडी राखून विजय मिळवून तिसरी आयपीएल ट्रॉफी जिंकली. आंद्रे रसेल (3/19), मिचेल स्टार्क (2/14) आणि हर्षित राणा (2/24) गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादच्या फलंदाजीला 113 धावांत गुंडाळले. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सनं सर्वाधिक 24 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला केकेआरच्या गोलंदाजांसमोर टिकून खेळता आलं नाही.

केकेआरने केवळ 114 धावांचे लक्ष्य 10.3 षटकांत पूर्ण केले. व्यंकटेश अय्यरने 200 च्या स्ट्राइक रेटने 26 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 52 धावांची नाबाद (सामना-विजेती) खेळी केली. आयपीएल मध्ये कोलकाता नाइट रायडर्सनं तिसऱ्यांदा ट्राॅफी जिंकून इतिहास रचला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक चौकार अन् षटकार मारणारे टॉप 5 खेळाडू, जाणून घ्या

ट्राॅफी जिंकल्यानंतर सुनील नारायणनं चक्क गौतम गंभीरला घेतलं उचलून! सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

कोलकाताच्या विजयानंतर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, गीतेचा श्लोक ट्वीट करत म्हणाला…

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---