हर्षित राणा दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये इंडिया ‘ड’ संघाकडून खेळत आहे. या सामन्यात ही हर्षितने तेच केले ज्यामुळे त्याला आयपीएल 2024 मध्ये दंड ठोठावण्यात आला होता. दंड झाल्यानंतरही हर्षित थांबला नाही. तर आता दुलीप ट्रॉफीमध्ये हर्षितने भारत ‘क’ संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडसोबत हे कृत्य केले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वास्तविक हर्षित राणाने दुलीप ट्रॉफीमध्ये आयपीएलप्रमाणे फ्लाइंग किस सेलिब्रेशन केला आहे. आयपीएल 2024 मध्ये हर्षित राणाने मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर त्याला फ्लाइंग किस दिला. ज्यासाठी हर्षितला दंडही ठोठावण्यात आला होता. इतकेच नव्हे तर त्याला आयपीएलमध्ये एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली होती. दरम्यान आता हर्षितने पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाडचे विकेट घेतल्यानंतर फ्लाइंग किस सेलीब्रेशन केला आहे.
— Gill Bill (@bill_gill76078) September 5, 2024
मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हर्षित राणा भारत ‘क’ कर्णधार ऋतुराज गायकवाडला स्लिप कॅचद्वारे बाद करताना दिसत आहे. आऊट होताच हर्षित त्याच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये फ्लाइंग किस देतो. आयपीएलमध्ये दंड ठोठावला असूनही हर्षितने पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली. हर्षित आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा भाग आहे.
भारत ‘क’ आणि भारत ‘ड’ यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी हर्षितने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. हर्षितने 7 षटके टाकली, ज्यात त्याने 2 बळी घेतले. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे हर्षितने 7 पैकी 5 मेडन षटके टाकली. त्याच्या स्पेलमध्ये त्याने केवळ 13 धावा केल्या. हर्षित हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. हर्षितशिवाय अक्षर पटेलनेही 2 बळी घेतले.
भारत ‘क’ आणि भारत ‘ड’ यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याचा पहिला दिवस खूपच मनोरंजक होता. प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील इंडिया ड संघ 164 धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर प्रत्युत्तरात पहिल्या डावात उतरलेल्या भारत ‘क’ संघाने दिवसअखेर 91/4 धावा केल्या.
हेही वाचा-
IPL 2025; कुमार संगकारा गौतम गंभीरची जागा घेणार? अहवालात मोठा खुलासा
Paralympics 2024; नवव्या दिवशी भारताच्या खात्यात येऊ शकतात 5 पदके, या खेळातून आशा
लय भारी! पॅरालिम्पिकच्या इतिहासात ज्युदोमध्ये भारताचे पहिलेच पदक