पुणे। इस्तांबुल (टर्की) येथे झालेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या हर्षवर्धन खराडे आणि आदिती परशेट्टी यांनी रौप्यपदक पटकाविले. हर्षवर्धन खराडे याने 93 किलो वजनी गटात (ज्युनियर) तर आदिती परशेट्टी हिने 63 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले.
हर्षवर्धन खराडे याने स्क्वॅटमध्ये 302.5 किलो वजन, बेंच प्रेसमध्ये 185.5 किलो वजन उचलून तर डेड लिफ्टमध्ये 237.5 किलो असे एकूण 722.5 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकाविले. स्क्वॅट आणि डेड लिफ्टमध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकाविले. कझाकिस्तानवर मात करीत त्याने ही कामगिरी केली.
आदिती परशेट्टी हिने 63 किलो वजनी गटात (वरीष्ठ) स्क्वॅट, डेडलिफ्ट प्रकारात एकूण 3 कांस्य आणि बेंचप्रेसमध्ये रौप्य पदक पटकाविले. जपानच्या खेळाडूवर मात करीत तिने ही कामगिरी केली.
हर्षवर्धन खराडे आणि आदिती परशेट्टी हे दोघेही सिंहगड रस्त्यावरील सोमण हेल्थ क्लब येथे गिरीश गीडी आणि राजहंस मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
महत्त्वाच्या बातम्या –
वरिष्ठ आणि खुली स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धा: महाराष्ट्राच्या संघाला ब्राँझ
वरिष्ठ आणि खुली राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धा: महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरला ब्राँझपदक