पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी दिवसंदिवस चांगलीच होत आहे. दरम्यान तिरंदाज हरविंदर सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे. पॅरालिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. काल (4 सप्टेंबर बुधवार) रोजी 33 वर्षीय हरविंदरने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपनच्या अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा 6-0 असा पराभव केला. या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. हरविंदरच्या सुवर्णपदकासह भारताच्या पदकांची संख्या आता 22 झाली आहे. भारताने आतापर्यंत 4 सुवर्ण, 7 रौप्य आणि 11 कांस्यपदके जिंकली आहेत.
हरविंदर सिंग आता पॅरालिम्पिकच्या इतिहासात तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही नवा विक्रम केला होता. त्यावेळी, पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकणारा तो पहिला तिरंदाज ठरला. पॅरिस पॅरालिम्पिकमधील तिरंदाजीमधील भारताचे हे दुसरे पदक आहे. याआधी शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजीमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
𝐇𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐢𝐜 𝐆𝐨𝐥𝐝 𝐀𝐥𝐞𝐫𝐭! 🥇
Harvinder Singh clinches India’s first Paralympic gold in archery with a stunning 6-0 victory over Poland’s Lucas Ciszek in the men’s individual recurve open event. 🏹#Paris2024 | #Paralympics pic.twitter.com/Vf138ic0GA
— Olympic Khel (@OlympicKhel) September 4, 2024
हरविंदर सिंग पॅरालिम्पिकच्या इतिहासातील तिसरे पदकही जिंकू शकतो. आता तो पूजा जटायनसह रिकर्व्ह तिरंदाजीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत पदकासाठी स्पर्धा करेल. सांघिक स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना आज (5 सप्टेंबर) रोजी ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. जर हरविंदरने या स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले तर तो एका पॅरालिम्पिक खेळात 2 सुवर्णपदके जिंकणारा इतिहासातील पहिला भारतीय खेळाडू बनेल.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने जिंकलेल्या पदकांची संख्या आता 22 वर पोहोचली असून त्यात 4 सुवर्ण, 8 रौप्य आणि 10 कांस्य पदकांचा समावेश आहे. आता भारत पदकतालिकेत 15 व्या स्थानावर आला आहे. याआधीच कोणत्याही एका पॅरालिम्पिक खेळात सर्वाधिक पदक जिंकण्याचा विक्रम मोडला आहे. याआधी झालेल्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला एकूण 19 पदकांवर समाधान मानावे लागले होते.
हेही वाचा-
कोहलीपासून धोनीपर्यंत कोणी भरला सर्वाधिक कर, ‘या’ दिग्गजाने भरले 66 कोटी रूपये
“रोहित शर्मासोबत फलंदाजी करणे म्हणजे…” स्टार खेळाडूने केले मोठे वक्तव्य
“ते 30 सेकंद अजूनही लाजवतात” विश्वचषक जिंकल्यानंतरचा किस्सा सांगताना दिग्गज भावूक