---Advertisement---

हरियाणा स्टिलर्स ‘टेबल टॉपर’ पटणा पायरेट्सला पराभूत करण्यात अपयशी, स्पर्धेतूनही झाले बाहेर

Haryana-Patna
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १९ तारखेला प्रो कबड्डीच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना झाला. या सामन्यात पटणा पायरेट्स आणि हरियाणा स्टिलर्स संघ आमने सामने होते. टेबल टॉपर पटणा पायरेट्सने ३०-२७ च्या फरकांनी हा सामना जिंकला आहे.

त्यांच्या विजयामुळे पुणेरी पलटणचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा आहे. दुसरीकडे हरियाणा स्टिलर्स संघ विजयाच्या नजीक पोहोचूनही प्लेऑफमध्ये मजल मारण्यात अपयशी ठरला आहे. 

तत्पूर्वी १३१ वा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध यू मुंबा संघात झाला. गुजरात जायंट्सने ३६-३३ च्या फरकाने यू मुंबांवर मात केली. या विजयानंतर गुजरात जायंट्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. तर प्रो कबड्डीचा १३० वा सामना जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पलटण यांच्यात झाला. पुणेरी पलटणने ३७-३० च्या फरकाने हा सामना जिंकला होता. परंतु पुणे संघाच्या विजयाचा फायदा बंगळुरू बुल्सला झाला असून त्यांनी प्लेऑफचे तिकीट मिळवले होते.

अशाप्रकारे पटणा पायरेट्स, दबंग दिल्ली, यूपी योद्धा, गुजरात जायंट्स, बंगळुरू बुल्स आणि पुणेरी पलटण संघ प्लेऑफमध्ये भिडताना दिसतील.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---