‘हरियाणा स्टीलर्स’ने (Haryana Steelers) ‘प्रो कबड्डी लीग’चा (Pro Kabaddi League) 11वा हंगाम जिंकला आहे. अशाप्रकारे हरियाणा स्टीलर्सने प्रथमच प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद पटकावले. हरियाणा स्टीलर्सने फायनलमध्ये पटना पायरेट्सचा पराभव करून इतिहास रचला. वास्तविक, पटना पायरेट्सने याआधी 3 वेळा विजेतेपद पटकावले असले तरी चौथ्यांदा विजेतेपद मिळवण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
शेवटच्या हंगामात हरियाणा स्टीलर्सचा फायनलमध्ये पराभव झाला होता. त्यावेळी त्यांनी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र यावेळी हरियाणा स्टीलर्सच्या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत ऐतिहासिक विजय मिळवला. हरियाणा स्टीलर्सने पटणा पायरेट्सचा 32-23 असा पराभव केला. हरियाणा स्टीलर्सकडून विनयने 6 गुण मिळवले. तर पटना पायरेट्ससाठी देवांकने चढाईत 5 गुण मिळवले. याशिवाय मोहम्मदरेझा शादलू आणि शिवम पटारे यांनी हाय-5 मारला. त्याचवेळी मोहम्मदरेझा शादलू खेळाडू म्हणून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला.
खरे तर फायनल सामन्याचे दडपण दोन्ही संघांच्या खेळाडूंवर स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे गुण कमीच राहिले. हरियाणा स्टीलर्सच्या खेळाडूंनी विजयाची नोंद केल्यानंतर थाटात सेलिब्रेशन केले. या खेळाडूंचा आनंद विलक्षण होता. शेवटच्या हंगामात हरियाणा स्टीलर्सचा फायनलमध्ये पुणेरी पलटणकडून पराभव झाला होता, मात्र यावेळी हरियाणा स्टीलर्सला आपले पहिले विजेतेपद पटकावण्यात यश आले.
𝗥𝗢𝗞𝗘 𝗥𝗨𝗞𝗗𝗘 𝗡𝗜 𝗛𝗔𝗥𝗬𝗔𝗡𝗩𝗜 💙#HaqqSeHaryanvi #NonStopHaryanvi #DhaakadBoys #HSvsPAT pic.twitter.com/HfOoIAV9lP
— Haryana Steelers (@HaryanaSteelers) December 29, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
WTCच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?
भारताची स्टार नेमबाज मनू भाकर ‘स्पोर्ट्स आयकॉन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने डाव का घोषित केला नाही? स्टार खेळाडूने सांगितले कारण