---Advertisement---

तेच मैदान, तेच विरोधक! तब्बल ६२ वर्षांनंतर इंग्लंडच्या सलामी जोडीची भारताविरुद्ध ‘नाद खुळा कामगिरी’

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 10:25 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर इंग्लंडच्या सलामी फलंदाजांनी टिचून फलंदाजी केली. दोघांनी मिळून शतकी भागीदारी करत ६२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे.

या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु भारतीय फलंदाज या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसून आले होते. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी परतले होते. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लिश फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली.

तब्बल ६२ वर्षानंतर झाला हा विक्रम
ज्या खेळपट्टीवर भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्याच खेळपट्टीवर इंग्लिश सलामीवीर फलंदाज रॉरी बर्न्स आणि हसिब हमीदने पहिल्याच डावात १३५ धावांची भागीदारी केली होती. दोघांनी मिळून इंग्लंड संघाला चांगली सुरुवात करून दिली. ही भारतीय संघाविरुद्ध हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लिश फलंदाजांनी केलेली दुसरी शतकी भागीदारी आहे. ६२ वर्षांपूर्वी १९५९ मध्ये पार्कहाऊस आणि गॉफ पुलर या इंग्लंडच्या सलामीवीरांनी मिळून भारतीय संघाविरुद्ध हेडिंग्लेच्या मैदानावर सर्वाधिक १४६ धावांची भागीदारी केली होती. (Haseeb hameed and Rory burns smashed second highest opening partnership against India at headingley)

इंग्लंड भक्कम स्थितीत
दुसऱ्या दिवसाचा (२६ ऑगस्ट) खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंड संघाकडे ४२ धावांची आघाडी होती. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या सलामीवीर फलंदाजांनी एकही फलंदाज बाद न होता १२० धावा केल्या होत्या.परंतु दुसऱ्या दिवशी मोहम्मद शमीने रॉरी बर्न्सला ६१ धावांवर त्रिफळाचित करत त्यांची भागिदारी मोडली. त्यानंतर रवींद्र जडेजाने हमीदला देखील ६८ धावांवर त्रिफळाचित करत माघारी धाडले. पुढे डेविड मलानने अर्धशतक आणि जो रूटने शतक संघाला ३०० पेक्षा जास्त धावांची आघाडी मिळवून दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

रूट नॉन-स्टॉप! आक्रमक शतकासह घातली आणखी दोन विक्रमांना गवसणी

इंग्लंड दौऱ्यातील पहिली विकेट घेत जडेजाने ‘हा’ रेकॉर्ड केला ब्रेक, हरभजनला पछाडलं

जो रूट एक्सप्रेस सुस्साट! इंग्लंडच्या कर्णधाराचे तुफानी शतक; मोडला मियाँदादचा रेकॉर्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---